Hashtagintro

विनोद कांबळीचा व्हिडीओ व्हायरल… सचिन तेंडुलकरबद्दल असं काय म्हणाला?

विनोद कांबळीचा व्हिडीओ व्हायरल… सचिन तेंडुलकरबद्दल असं काय म्हणाला?

प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या एका कारणासाठी चर्चेत आहे. ते कारण म्हणजे विनोद कांबळीची प्रकृती आणि आर्थिक स्थिती. विनोद कांबळीची तब्येत मध्यंतरी खूप खालावली होती. त्याला चालायलाही त्रास होत होता. त्याची आर्थिक स्थिती नसल्याने उपचाराला अडचणी येत होत्या. त्यावेळी अनेक नव्या जुन्या क्रिकेटपटूंनी विनोद कांबळीला मदतीचा हात दिला होता. त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यानंतर विनोद पुन्हा चर्चेत आला. त्याला वृद्धाश्रमात भरती केल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे अनेकांना गलबलून आलं होतं. आता विनोदचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर झाला आहे. त्यात तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबद्दल बोलताना दिसत आहे.

विनोद कांबळीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात त्याला एकजण प्रश्न विचारतो. त्याला विनोद पटकन उत्तर देताना दिसत आहे. सर, तुम्ही सर्वाधिक कोणत्या बॉलरला झोडलं होतं? असा सवाल विनोदला हा तरुण करतो. त्यावर शेन वॉर्न, असं उत्तर विनोद देतो. शेन वॉर्नला कुठे झोडलं होतं? असं विचारताच ऑस्ट्रेलियात खेळताना असं विनोद म्हणतो. त्यानंतर हा तरुण विनोद कांबळीला सचिन तेंडुलकरबद्दल विचारतो. सचिनला मास्टर ब्लास्टर हे नाव कुणी दिलं? असा सवाल हा तरुण विनोदला विचारतो. त्यावर विनोद हसत हसत मीच हे नाव दिलं असं सांगतो.

तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा

त्यानंतर हा तरुण विनोद कांबळीच्या तब्येतीची माहिती देतो. विनोद कांबळी फिट आहेत. हेल्दी आहेत. त्यांची प्रकृती चांगली आहे. तुम्ही त्यांच्या हेल्थसाठी प्रार्थना करा, असं आवाहन हा तरुण करतो.

कोणत्या कोणत्या आजाराने त्रस्त?

विनोदला अनेक समस्यांनी ग्रासले होते. 2013मध्ये त्यांना मुंबईत गाडी चालवत असताना हार्ट अटॅक आला होता. त्याआधी 2012मध्ये त्याची अँजिओप्लास्टि झाली होती. या आजारामुळे त्याच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. विनोदला डिप्रेशनचाही त्रास आहे. दारूच्या सवयीमुळे त्याची प्रकृती आणखीनच खालावली होती. दारू सोडण्यासाठी तो रिहॅबमध्येरही जाऊन आला होता. पण त्याची सवय काही सुटली नव्हती. त्यातच आर्थिक अडचणीमुळे त्याच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language