Hashtagintro

शेअर बाजारात दिवाळीपूर्वीच लगीनघाई! सेन्सेक्स-निफ्टीत ऐतिहासिक उसळी; एका झटक्यात गुंतवणूकदार मालामाल

Mumbai: गुरुवारी शेअर बाजारात आजवरच्या इतिहासातील एक अत्यंत संस्मरणीय आणि ऐतिहासिक उसळी पाहायला मिळाली. जगभरातील सकारात्मक संकेतांच्या जोरावर बाजाराने घेतलेली मोठी झेप गुंतवणूकदारांसाठी मोठी पर्वणी ठरली आहे. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 2,008.61 अंकांनी, म्हणजेच तब्बल 2.6 टक्क्यांच्या मजबूत वाढीसह 79,310.01 या अंकांवर येऊन बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 576 अंकांनी (2.4%) झेपावत 24,536.60 वर स्थिरावला. गेल्या 7 महिन्यांतील ही सर्वात मोठी एकदिवसीय वाढ ठरली असून, थेट 8 एप्रिलनंतर निर्देशांकाने अशी विक्रमी मजल मारली आहे. सलग 6 व्या सत्रात बाजार तेजीत राहिल्यामुळे सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य (Market Cap) थेट 501 लाख कोटी रुपयांच्या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचले आहे. या एकाच दिवसाच्या जोरदार तेजीमुळे देशातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 8.2 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे, ज्यामुळे अक्षरशः दिवाळीपूर्वीच आनंदाचे वातावरण पसरले आहे.

तेजीचे मुख्य कारण काय?
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींनी या तेजीला बळ दिले. कच्च्या तेलाच्या (Crude Oil) आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये झालेली मोठी घसरण आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाला मिळालेले यश यामुळे पश्चिम आशियातील तणाव व संघर्ष लवकरच मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भू-राजकीय घडामोडींमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदीचा सपाटा लावला, ज्याचा थेट फायदा बाजाराला मिळाला.
https://www.prahaar.in/2026/11/04/gold-and-silver-price-hike-a-major-blow-to-buyers-just-before-diwali-significant-rise-in-gold-and-silver-prices/
दिग्गज समभागांमध्ये तुफान खरेदी
आजच्या या तेजीच्या लाटेत बाजारातील जवळपास सर्वच प्रमुख क्षेत्रांमधील समभाग तेजीत होते. प्रामुख्याने बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि टीसीएस यांसारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स जोरदार खरेदीमुळे वधारले. या दमदार कामगिरीमुळे निफ्टी आता 11 ऑगस्टनंतरच्या आपल्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. जरी वर्षाच्या सुरुवातीच्या तुलनेत निर्देशांक अजूनही काहीसा खाली असला, तरी याएकाच दिवसाच्या मुसंडीने बाजारातील मंदीचे मळभ पूर्णपणे दूर केले आहे.

पुढील वाटचाल कशी असेल?
बाजार तज्ज्ञांच्या मते, निफ्टीसाठी आता 24,550 ते 24,600 ही पातळी पुढील मोठा तांत्रिक अडथळा ठरू शकते. जर बाजार या पातळीच्या वर टिकून राहिला, तर आगामी काळात आणखी नवीन उच्चांक पाहायला मिळू शकतात. मात्र, सध्याच्या या तुफान तेजीनंतर गुंतवणूकदारांमध्ये आणि सामान्यांमध्ये दिवाळीपूर्वीच अक्षरशः उत्सवाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language