Hashtagintro

संविधान दिनी राज्यातील 11 गड-किल्ल्यांवर स्वच्छता अभियान! रायगडावर 'गडांचा मान, संविधानाचा सन्मान'

रायगड : भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांची जाणीव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय संविधान दिनानिमित्त राज्यातील 11 गड-किल्ल्यांवर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. किल्ले रायगडावर ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि संविधानिक मूल्यांचा जागर या उपक्रमातून केला जाणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/24/philately-quiz-held-on-the-theme-development-and-heritage-20-teams-from-vidarbha-participate-with-the-winning-team-set-to-compete-at-the-regional-level/
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 9 वाजता हिरकणीवाडी, किल्ले रायगड येथील रायगड रोपवे परिसरात विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ऐतिहासिक वारशाचे जतन, संविधानिक कर्तव्यांची जाणीव आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम साधण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने किल्ले परिसरात स्वच्छता आणि पर्यावरण जनजागृती अभियान, सामूहिक संविधान उद्देशिका वाचन, संविधान प्रतिज्ञा, पर्यावरण संवर्धनाचा संकल्प तसेच सांस्कृतिक आणि लोककला कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/24/shocking-17-people-suffer-food-poisoning-after-eating-shawarma-children-among-those-affected-currently-undergoing-treatment-in-the-hospital/
या उपक्रमाचा एक भाग म्हणून राज्यातील 11 गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. किल्ले रायगडावर कोकणकडा मित्र मंडळ आणि सहयोगी संस्थांच्या वतीने सकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे. ऐतिहासिक वास्तू, गड-किल्ले आणि परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर या मोहिमेत भर दिला जाणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/24/job-opportunity-at-shivaji-university-walk-in-interviews-for-shivvani-community-radio/
भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेली मूल्ये, स्वातंत्र्याची जाणीव, मूलभूत कर्तव्ये आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याची जबाबदारी तरुण पिढीमध्ये रुजविण्याचा या उपक्रमातून प्रयत्न केला जाणार आहे. या विशेष सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी केले आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language