Hashtagintro

समुद्रात खळबळ, चीनने वाढवले जगाचे टेन्शन, भारताला मोठा धोका, थेट दररोज 100 चिनी जहाजे..

समुद्रात खळबळ, चीनने वाढवले जगाचे टेन्शन, भारताला मोठा धोका, थेट दररोज 100 चिनी जहाजे..

चीन गेल्या काही दिवसांपासून आपली सैन्य ताकद मोठ्या प्रमाणात वाढवत आहे. आशियातील सागरी मार्गांवर दररोज सुमारे 100 चिनी नौदलाची जहाजे कार्यरत असतात. चीनची वाढणारी समुद्री ताकद अमेरिकेसाठी मोठी डोकेदुखी बनलीये. चीन सतत आपली ताकद वाढवत असल्याने अमेरिकेच्या सैन्य तज्त्रांनी मोठी चिंता व्यक्त केली. चीन हा जहाजांमध्ये अमेरिकेच्याही पुढे निघून गेला. मिडिया रिपोर्टनुसार, चीनजवळ 400 पेक्षा अधिक युद्धनाैका आणि पाणबुडी आहेत. अमेरिकेपेक्षा 35 टक्क्यांनी जहाज निर्मितीमध्ये पुढे गेला. याचे कारण म्हणजे जहाज उद्योग चीनमध्ये प्रचंड वाढला. चीन हा जगातील सर्वात मोठा जहाज तयार करणारा देश बनला आहे. इथे मोठ्या प्रमाणात जहाज मिळतात. अत्याधुनिक जहाजा चीन तयार करतो.

चीनची नौदल जहाजे दक्षिण चीन समुद्र, तैवानच्या आसपास, फिलीपिन्सच्या पूर्वेकडील जलक्षेत्रात आणि जपानच्या दक्षिण किनारपट्टीजवळ सक्रिय आहेत. प्रशांत महासागरातही चीन आपला दबाव वाढवत आहे.यासोबतच अदनच्या खाडीतही त्यांनी ताकद वाढवली. तायवानच्या अधिकाऱ्याने शेअर केलेल्या नकाशानुसार, 53 चीनी जहाज तिथे दिसले आहेत.

यात 34 नौदल युद्धनौकांचा समावेश होता. विमानवाहू युद्धनौका लिओनिंग आणि तिच्यासोबतची इतर जहाजे फिलीपिन्सच्या पूर्वेला तैनात करण्यात आली. तीन जहाजे जपानच्या दक्षिण समुद्राच्या आसपास दिसली गेली आहेत.
जपानी संरक्षण अधिकाऱ्यांनी तीन चिनी युद्धनौका आणि एका तटरक्षक जहाजावरही लक्ष ठेवले. ओसुमी सामुद्रधुनीतून पॅसिफिक महासागराच्या दिशेने जात होती.  प्रशांत महासागरात चीनकडून युद्धभ्यासही करण्यात आला. चीनची वाढती ताकद अमेरिकेसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे.

तैवान आणि दक्षिण चीन समुद्रावरून या प्रदेशात तणाव वाढत असतानाच, चीनची वाढती सागरी ताकद समोर आली आहे. चीन आणि जपानमधील संबंधही तणावपूर्ण आहेत. त्यातच आता अमेरिकेचेही टेन्शन वाढले आहे. भारत आणि चीनमधील संबंध सध्या चांगली आहेत. दोन्ही देशातील संबंध सुधारली आहेत. पण काही सीमेच्या मुद्द्यावरून दोन्ही देशात तणाव बघायला मिळतोय. अरूणाचल प्रदेशातील काही भागात सीमेवर तणाव वाढला आहे.

Source: TV9 Marathi International

Read full article on TV9 Marathi International

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language