Hashtagintro

सलमान खानच्या हातून या अभिनेत्याचा गेला असता जीव, अशोक सराफ यांनी सांगितला थरारक किस्सा

सलमान खानच्या हातून या अभिनेत्याचा गेला असता जीव, अशोक सराफ यांनी सांगितला थरारक किस्सा

चित्रपटांमधील अ‍ॅक्शन सीन्स प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. पडद्यावर हे सीन्स पाहताना प्रेक्षक रोमांचित होतात. मात्र असे प्रसंग शूट करताना कलाकारांच्या जीवावरही बेतू शकते. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला अपघात आजही अनेकांच्या लक्षात आहे. असाच एक धक्कादायक प्रसंग लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबतही घडला होता. विशेष म्हणजे, या प्रसंगात अभिनेता सलमान खानच्या हातात खरा चाकू होता आणि अशोक सराफ थोडक्यात बचावले होते.

अशोक सराफ यांनी एका मुलाखतीमध्ये 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जागृती’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला हा प्रसंग सांगितला होता. या चित्रपटाच्या एका सीनमध्ये सलमान खानने अशोक सराफ यांच्या गळ्याला चाकू लावायचा होता. मात्र, हा चाकू खरा असल्याचे अशोक सराफ यांना नंतर जाणवले.

शूटिंग सुरू असताना सलमान खानने चाकू त्यांच्या गळ्यावर अधिक जोराने दाबला. त्यावेळी अशोक सराफ यांनी त्याला सावध करण्याचा प्रयत्न केला. ‘हळू दाब, इथे कट होत आहे,’ असे त्यांनी सलमानला सांगितले होते.

कॅमेऱ्यात बदल दिसेल म्हणून सलमानने दिला नकार

अशोक सराफ यांनी सलमान खानला चाकू उलटा पकडण्याचा सल्लाही दिला होता. मात्र, असे केल्यास कॅमेऱ्यात चाकू पकडण्याची पद्धत बदललेली दिसेल असे सलमानने सांगितले. त्यामुळे तो सीन तसाच पूर्ण करण्यात आला.

मात्र, शूटिंग पूर्ण झाल्यानंतर अशोक सराफ यांच्या गळ्याला खोल जखम झाल्याचे आणि त्यातून रक्त येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रसंगाची आठवण सांगताना त्यांनी हा अपघात किती गंभीर ठरू शकला असता हे स्पष्ट केले.

‘ती नस कापली असती तर माझा जीव गेला असता’

या घटनेबद्दल बोलताना अशोक सराफ यांनी सांगितले की, गळ्याजवळील नस कापली गेली असती तर त्यांचा जीवही जाऊ शकला असता. हा प्रसंग त्यांच्या आयुष्यातील कधीही न विसरता येणारा अनुभव ठरला.

अमिताभ बच्चन यांच्यासोबतही घडला होता गंभीर अपघात

दरम्यान, अशाच प्रकारची घटना अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडली होती. अ‍ॅक्शन सीन शूट करताना अभिनेता पुनीत इस्सर यांची बुक्की अमिताभ बच्चन यांना जोरात लागली होती. यामुळे अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यावेळी संपूर्ण देश त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होता.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language