Hashtagintro

सलमान खान, अमिताभ बच्चन ते रणबीर कपूर.. सेलिब्रिटींना मुंबई पोलिसांचा मोठा इशारा

सलमान खान, अमिताभ बच्चन ते रणबीर कपूर.. सेलिब्रिटींना मुंबई पोलिसांचा मोठा इशारा

बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींसाठी विशेष सुरक्षा सूचना जारी केल्या आहेत. सलमान खान, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आमिर खान आणि अक्षय कुमार यांसारख्या कलाकारांच्या सुरक्षेबाबत पोलीस सतर्क झाले आहेत. सार्वजनिक ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घ्या, चाहत्यांच्या गर्दीत मिसळणं टाळा आणि अनावश्यक गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असा सल्ला पोलिसांनी कलाकारांना दिला आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मिळणाऱ्या धमक्या आणि सेलिब्रिटींच्या घरांची कथित रेकी झाल्याच्या माहितीमुळे मनोरंजनविश्वात चिंतेचं वातावरण आहे.

टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर पोलिसांचा अलर्ट

18 ऑक्टोबर रोजी मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या गाडीवर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या घटनेत टायगर सुदैवाने बचावला. मात्र, त्याचा ड्रायव्हर आणि अन्य एक व्यक्ती जखमी झाले होते. या घटनेनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करणारी सोशल मीडिया पोस्ट समोर आली होती. या पोस्टमध्ये सलमान खानसोबत काम करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांनाही धमकी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कलाकारांना सार्वजनिक ठिकाणी सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेषतः चाहत्यांसोबत फोटो काढताना किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना अतिरिक्त खबरदारी घेण्यास सांगण्यात आलं आहे.

रणबीर, आमिर, अक्षय यांच्या घरांचीही रेकी?

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाच्या तपासादरम्यान काही महत्त्वाची माहिती समोर आल्याचं वृत्त आहे. आरोपींनी मुंबईतील अनेक बड्या सेलिब्रिटींच्या घरांची रेकी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार आणि रणबीर कपूर यांच्या नावांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांच्या तपासात आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कलाकारांच्या घरांची पाहणी केल्याची माहिती समोर आली आहे. कलाकारांच्या सुरक्षेची व्यवस्था कशी आहे, याची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशयही तपास यंत्रणांना आहे. त्यामुळे पोलिसांनी आता सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर

लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला याआधीही अनेकदा धमक्या देण्यात आल्या आहेत. 1998 मधील काळवीट शिकार प्रकरणामुळे बिश्नोई समाजाची सलमानवर नाराजी असल्याचं सांगितलं जातं. ऑक्टोबर 2024 मध्ये सलमानचे जवळचे मित्र आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारीही बिश्नोई गँगने स्वीकारल्याचा दावा केला होता. यानंतर सलमानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली. टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर सलमानसोबत काम करणाऱ्या कलाकारांनाही धमकी दिल्याने बॉलिवूडमधील भीती आणखी वाढली आहे.

याआधी दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराबाहेरही गोळीबार झाला होता. तसंच कॉमेडियन कपिल शर्मालाही धमकी मिळाल्याचं वृत्त समोर आलं होतं.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language