Hashtagintro

सलामीवीर म्हणून संजू नको तर वैभव हवाय…मॅचनंतर अभिषेक शर्मा जे म्हणाला त्याची जोरदार चर्चा

सलामीवीर म्हणून संजू नको तर वैभव हवाय…मॅचनंतर अभिषेक शर्मा जे म्हणाला त्याची जोरदार चर्चा

IND vs NZ 3rd T20 Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली. भारतीय संघ ३-० ने मालिके आघाडीवर आहे. काल तिसरा सामना रंगला ज्यात न्यूझीलंडच्या संघाची झोप उडाली. अभिषेक शर्माने कालच्या सामन्यात जी खेळी खेळली त्याची जगभरात चर्चा सुरु आहे. अनेक क्रिकेट दिग्गजांनी त्याचे कौतुक केले. अभिषेकला भक्कम साथ मिळाली ती वैभव सूर्यवंशीची. आता पुढील सामन्यापूर्वी अभिषेकने वैभवबद्दल एक विधान केले ते सध्या चर्चेत आहे.

अभिषेक म्हणाला की, “माझा आणि वैभव सूर्यवंशीचा मुख्य उद्देश संघाला जलद सुरुवात करून देणे, फलंदाज म्हणून आम्ही अशा विक्रमांचा पाठलाग करत नाही. संघाला सामने जिंकण्यास मदत करणे हेच आमचे ध्येय असते. विशेषतः वैभवच्या बाबतीत हीच आमची योजना होती. आम्हाला मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये हीच शैली कायम ठेवायची आहे आणि यावेळी आमची योजना यशस्वी झाली. “१५ वर्षीय सूर्यवंशीने १९ चेंडूंमध्ये चार चौकार आणि चार षटकारांसह ४५ धावा केल्या. त्याने अभिषेकसोबत ११८ धावांची सलामीची भागीदारी केली. अभिषेकने या दरम्यान जे विधान केले उर्वरित सामन्यांमध्ये आम्हाला हीच शैली कायम ठेवायची आहे. याचा अर्श असा होतो की आता अभिषेक आणि वैभव अशी जोडी सलामीला येईल, तर संजूला तिसऱ्या क्रमांकावर खेळावे लागेल.

अभिषेकने आपल्या आक्रमक फलंदाजीचे श्रेय संघाच्या प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना आणि सराव सत्रांना दिले. तो म्हणाला की, साईडआर्म चेंडूंविरुद्धच्या सततच्या सरावामुळे मला माझ्या नैसर्गिक शैलीत फलंदाजी करण्यास मदत झाली, मी हे सोपे आहे असे म्हणणार नाही. तयारी खूप महत्त्वाची आहे. मला विशेषतः आमच्या प्रशिक्षकांचा उल्लेख करायला आवडेल, कारण आम्ही साईडआर्म चेंडूंविरुद्ध खूप सराव करत आहोत, फलंदाजी करताना खेळपट्टीची स्थिती, मैदानाचा आकार आणि गोलंदाजाची शैली लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. तुम्ही खेळपट्टीची स्थिती आणि सीमारेषेचे अंतर लक्षात ठेवता. तुम्हाला गोलंदाजालाही लक्षात ठेवून त्यानुसार फटके खेळावे लागतात. मी तेच करतो.”

अभिषेक म्हणाला की, “सोमवारचा सराव खूप चांगला झाला आणि मला त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा होता आणि मी तेच केले. मला वाटते की मी या खेळीची आधीच कल्पना केली होती आणि मग ती प्रत्यक्षात उतरली. पहिल्याच चेंडूपासून वैभवच्या आक्रमक दृष्टिकोनामुळे भारतीय डावाला गती मिळाली. सूर्यवंशीने पहिल्या षटकात ज्या प्रकारे सुरुवात केली ती खरोखरच खास होती. संघाला सुरुवातीला गती देणे आणि नंतर ती गती कायम ठेवणे ही आमची योजना होती.”

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language