Hashtagintro

साप दिवसा अधिक चावतात की रात्री? हा टाइम लक्षात ठेवा; खुलासा ऐकूनच धडधड वाढेल

साप दिवसा अधिक चावतात की रात्री? हा टाइम लक्षात ठेवा; खुलासा ऐकूनच धडधड वाढेल

सर्वांच्या काळजाची धडधड वाढेल असं नवं संशोधन समोर आलं आहे. साप दिवसा जास्त चावतात की रात्री? असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. त्यावरच प्रकाश टाकण्यात आला आहे. साप चावण्याचा धोका दुपारी 12 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अधिक असतो. आकडेवारीनुसार, 15,931 प्रकरणात साप चावण्याच्या वेळा नोंदवण्यात आल्या होत्या. 39 टक्के घटनांमध्ये याच सहा तासात साप चावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत साप चावण्याच्या 29 टक्के घटना घडल्या आहेत. तर मध्यरात्रीपासून पहाटे 6 वाजेपर्यंत 12 टक्के घटना घडल्या आहेत. एम्स देवघर आणि अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने हे संशोधन केलं आहे. हे संशोधन करण्यासाठी 2 लाख 14 हजार रेकॉर्डेड साप चावण्याच्या घटनांचा डेटा तपासण्यात आला.

सर्वाधिक धोका कधी?

शेती आणि कृषी कामाशी संबंधित ठिकाणी साप चावण्याच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. या ठिकाणी साप चावण्याच्या 59 टक्के घटना घडल्या आहेत. त्यानंतर काम करताना 9 टक्के आणि इतर प्रकारच्या कामावेळी 8.4 टक्के घटना घडल्या आहेत. साप चावण्याच्या घटना केवळ शेतीपुरत्या मर्यादित नाहिये. तर 3.6 टक्के घटना साप पकडताना घडल्या आहेत. तर झोपलेले असंताना किंवा आराम करत असताना साप चावण्याच्या 2.4 टक्के घटना घडल्या आहेत. मासे पकडताना किंवा जलस्त्रोताशी संबंधित घटनांच्यावेळी साप चावण्याच्या 0.4 टक्के घटना घडल्या आहेत. तर खेळत असताना लहान मुलांना साप चावण्याच्या 0.3 टक्के घटना घडल्या आहेत.

हे साप खतरनाक

1,16,759 नोंदींचं विश्लेषण केलं असता वायपर किंवा पिट वायपर जातीचे साप चावण्याचे प्रकार सर्वाधिक आहे. वायपर किंवा पिट वायपर जातीच्या सापांनी चावण्याचे प्रमाण तब्बल 85.12 टक्के इतकं आहे. कोब्रा साप चावण्याचं प्रमाण 2.84 टक्के, मण्यार साप चावण्याचे प्रमाण 1.9 टक्के आहे. तर कोब्रा-मण्यार साप चावण्याचे प्रमाण 1.9 टक्के आहे. सागरी साप चावण्याचे प्रमाण 0.16 टक्के आहे. इतर सापांच्या प्रजातींच्या चावण्याचे प्रमाण 8.8 टक्के आहे.

राष्ट्रीय स्तरावर रसेल वायपर साप चावण्याचं प्रमाण 51.3 टक्के आहे. त्यानंतर कॉमन मण्यार 22.3%, सॉ-स्केल्ड वायपर 10% आणि स्पेक्टेकल्ड कोब्रा 8.9% प्रमाण आहे. बिग फोर या सर्वाधिक विषारी सापांच्या समूहातील हे साप आहेत.

या वेळेत भीती

आकडेवारीनुसार, साप चावण्याच्या घटना दुपारी 12 ते संध्याकाळी 5 दरम्यान अधिक होतात. या काळात ग्रामीण आणि कृषी क्षेत्राशी संबंधित लोकांची लगबग अधिक असते. तर, संध्याकाळी साप अधिक सक्रीय होतात. अशावेळी एखादी संपर्कात आल्यास त्याला सापापासून धोका होऊ शकतो. त्यामुळे शेतात काम करणाऱ्यांनी दुपार ते संध्याकाळपर्यंत सावध राहिलं पाहिजे. शेतात गवत आणि झाडाझुडपात जाताना पायात बूट घातले पाहिजे. तसेच लांब कपडे घातले पाहिजे. अंधारात टॉर्च वापरला पाहिजे. तसेच सापांच्या संभाव्य ठिकाणांमध्ये हात घालणं टाळलं पाहिजे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language