Hashtagintro

सोनं खरेदीची घाई करू नका! ‘या’ तीन तारखा लक्षात ठेवा; ठरवणार सोनं महाग होणार की स्वस्त

सोनं खरेदीची घाई करू नका! ‘या’ तीन तारखा लक्षात ठेवा; ठरवणार सोनं महाग होणार की स्वस्त

सोन्याच्या किमतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव घसरत आहेत. हे दर अजून कधी घसरणार? घसरणार की नाही? आताच खरेदी करावे की नाही? असे अनेक प्रश्न सध्या सगळ्यांच्याच मनात आहेत. या वर्षाच्या जानेवारी महिन्यात २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १.८३ लाख रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले होते. मात्र, सध्या दिल्लीत ते सुमारे १.२५ लाख रुपयांच्या आसपास आहे. याचाच अर्थ काय तर अवघ्या ११ महिन्यांत त्यात ३१ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. आता सोने अजून स्वस्त होईल की पुन्हा सावरण्यास सुरुवात होईल, याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकेकडून येणाऱ्या तीन महत्त्वाच्या घोषणांकडे सर्वांचे लक्ष आहे. या घोषणा २५ नोव्हेंबर, ४ डिसेंबर आणि ९ डिसेंबर रोजी अपेक्षित आहेत.

या तारखा का आहेत महत्त्वाच्या?

२५ नोव्हेंबर, ४ डिसेंबर आणि ९ डिसेंबर रोजी काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडणार आहेत यामुळेच तुम्हाला या तारखांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

२५ नोव्हेंबर

गेल्या महिन्यातील अमेरिकेतील महागाईची आकडेवारी बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता जाहीर केली जाईल. यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. ऑक्टोबर महिन्यासाठीचा पीसीई महागाई अहवाल गुंतवणूकदारांना अमेरिकेतील प्रत्यक्ष किमतींच्या दबावाबाबत स्पष्ट संकेत देईल. जर महागाई वाढली, तर फेडरल रिझर्व्ह अधिक कठोर भूमिका घेऊ शकते. जर कठोर भूमिका घेतली तर सोन्यावर अधिक दबाव निर्माण होऊ शकतो.

४ डिसेंबर

४ डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता, नोव्हेंबर महिन्यासाठी अमेरिकेतील रोजगाराच्या स्थितीबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला जाईल. यातून अमेरिकेच्या श्रम बाजाराच्या मजबुतीबद्दल माहिती मिळेल. नोकऱ्यांमध्ये मोठी वाढ झाल्यास डॉलरला बळकटी मिळू शकते. पण जर ही आकडेवारी कमकुवत राहिल्यास सोन्याची मागणी वाढू शकते.

९ डिसेंबर

अजून एक महत्त्वाची तारीख म्हणजे ९ डिसेंबर. बाजार एका तिसऱ्या, अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीचीही उत्सुकतेने वाट पाहत आहे जी ९ डिसेंबर रोजी घडणार आहे. तर ९ डिसेंबरला अमेरिकेची मध्यवर्ती बँक, ‘फेडरल रिझर्व्ह’ची घोषणा होणार आहे. ही घोषणा भारतीय वेळेनुसार मध्यरात्री १२:३० वाजता होणार आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष केवळ व्याजदरांत किती बदल केले जातात यावरच नसेल, तर भविष्यात व्याजदर कोणत्या दिशेने जातील, याबद्दल फेडरल रिझर्व्हचा दृष्टिकोन काय आहे, यावरही असेल.

( Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, बाजारातील गुंतवणूक ही बाजारपेठेतील जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूकदार म्हणून, आपले पैसे गुंतवण्यापूर्वी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. TV9 मराठी कोणालाही पैसे गुंतवण्याचा सल्ला देत नाही.)

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language