
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांच्या ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रात अनेक राजकीय निर्णयांचा उलगडा केला आहे. त्यांना सुरुवातीला राजकारणाविषयी तिटकरा होता, असेही त्यांनी सांगितले. राजकारणाचं जग, त्यातील महत्त्वाकांक्षा आणि लोभ, ढोंगीपणा आणि सत्तेच्या खेळ, विश्वासघातकी वृत्तीचा तिटकारा होता. मी राजकारणात येऊ नये, असं राहुल आणि प्रियांका यांचं मत होतं. दोघांनी याबाबत माझ्याशी चर्चा केली होती. कारण त्यांना मला गमवायचं नव्हतं, असा खुलासा सोनिया गांधी यांनी केला.
सोनिया गांधींनी लिहिलेलं आत्मचरित्राची जोरदार चर्चा होत आहे. आत्मचरित्रावरून एका मुलाखतीत सोनिया गांधींनी म्हटलं की, 1990 च्या दशकात उत्तरार्धात काँग्रेस पक्ष कठीण काळातून जाताना पती राजीव गांधी, सासू इंदिरा गांधी यांची छायाचित्रे पाहताना वेदना, अपराधीपणाची भावना एकाचवेळी जाणवायची. माझा स्वत:शीच संघर्ष सुरू होता. राजकारणाचे जग, महत्वाकांक्षा, लोभ, ढोंगीपणा , सत्तेच्या खेळ, विश्वासघातकी वृत्तीविषयी तिटकारा होता’.
सोनिया गांधी यांनी आणीबाणी संदर्भातही त्यांच्या आत्मचरित्रात उल्लेख केलाय. आणीबाणी लागू झाल्यानंतर नेमकं काय घडत होतं, याची तीव्रता ही नंतर समजली. त्यावेळी लोकशाही अधिकारांवर मर्यादा आणल्या गेल्या होत्या. तसेच त्या काळी बंदी प्रत्यक्षीकरणाचाही अधिकार निलंबित करणयात आल्याचेही सोनिया गांधींनी सांगितले. तसेच हे सर्व घटनात्मक प्रक्रियेनुसार करण्यात आल्याचे सोनिया गांधींनी नमूद केलं.
देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सोनिया गांधी यांनी आत्मचरित्रात नमूद केलं. माझ्या सासू व तत्कालीन इंदिरा गांधींना ही कालांतराने जाणीव झाली होती. खरंतर त्या मनाने लोकशाहीवादी होत्या. तत्कालीन इंदिरा गांधी यांच्या हत्या झाली, त्याच दिवशी राजीव गांधी यांना पंतप्रधानपदाची शपथ घेण्यास सांगण्यात आलं होतं. ही बाब राजीव यांना सांगितली. त्यावेळी माझ्या हृदयात कुणीतरी सुरा खुपसल्याची भावना निर्माण झाली होती, असं सोनिया गांधी यांनी मुलाखतीत सांगितलं. त्यावेळी त्यांना हा निर्णय घेऊ नये, अशी विनंती केली होती, असंही त्या म्हणाल्या.
‘कर्तव्याची जाणीव, मनातील भीती यांच्यात होणाऱ्या संघर्षामुळे व्यथित झाले होते. त्यावेळी मी भगवद्गीतेचा आधार घेतला. कर्माच्या फळाची अपेक्षा न ठेवता धर्माचरण करा, असं भगवान श्रीकृष्णा यांनी गीतेत म्हटलंय. तसेच माझ्या मनातील शंका आणि प्रश्नाची उत्तरे मिळाली होती. तेव्हा मी कर्त्यव्याला महत्व दिलं, असेही त्यांनी पुढे सांगितले.
Source: TV9 Marathi National
