Hashtagintro

सौदी अरबच्या मंत्रालयावर बॅलेस्टीक मिसाईलने हल्ला, हुतींच्या दाव्याने खळबळ

सौदी अरबच्या मंत्रालयावर बॅलेस्टीक मिसाईलने हल्ला, हुतींच्या दाव्याने खळबळ

इराण आणि इस्रायल – अमेरिकेचे युद्ध संपलेले नसताना आता इराण समर्थित येमेनच्या हुती बंडखोरांनी मंगळवारी ( २७ ऑक्टोबर २०२६ ) सौदी अरबची राजधानी रियाद येथील संरक्षण मंत्रालयावर बॅलेस्टिक मिसाईल हल्ला केल्याचा दावा केला आहे. ही बॅलेस्टिक मिसाईल थेट निशाण्यावर लागल्याचे हुतींनी म्हटले आहे. हुतींचे मिलिट्री प्रवक्ते याह्या सरी यांनी म्हटले की आमच्या सशस्र दलाने शत्रूची राजधानी रियाद येथील संरक्षण मंत्रालयाला बॅलेस्टिक मिसाईलने लक्ष्य केले आहे आणि हल्ला थेट निशाण्यावर लागला आहे.

सौदी अरबने मंगळवारी हुतींनी डागलेल्या मिसाईल आपण रोखल्याचा दावा केल्यानंतर हुतींनी हा दावा केला आहे. न्यूज एजन्सी एएफपीच्या वृत्तानुसार रियादमध्ये जोरदार स्फोटांचा आवाज ऐकू आल्याचे म्हटले आहे.

रास तनुरा तेल रिफायनरीवर हल्ल्याचा दावा

हुतींनी हा देखील दावा केला आहे की त्यांनी सौदी अरबची सर्वात मोठी तेल रिफायनरी रास तनुराला देखील लक्ष्य केले आहे. ही रिफायनरी स्ट्रेट ऑफ होर्मुजच्या पश्चिम दिशेला खाडीच्या किनारी स्थित आहे. हुती मिलिट्रीचे प्रवक्ते याह्या सरी यांनी म्हटले आहे की त्यांनी रिफायनरीवर एक बॅलेस्टिक मिसाईल डागली. ज्यामुळे तेथे आग लागली. मात्र, सौदी अरबच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिलेला नाही.

सौदी अरब आणि इराणच्या समर्थन असलेल्या हुती बंडखोरात सप्टेंबर महिन्यापासून संघर्ष वेगवान झाला आहे. हा तणाव अमेरिका आणि इराणच्या दरम्यान सुरु असलेल्या युद्धाच्या अनेक महिन्यानंतर वाढला आहे.

हूतीसंगे मध्यस्थीसाठी सौदीची वित्तीय पॅकेजची ऑफर

तर दुसरीकडे इस्रायल हायोमच्या सोमवार ( २६ ऑक्टोबर )च्या रिपोर्टमध्ये खाडी क्षेत्रातील राजकीय सूत्रांच्या हवाल्याने एक वृत्त दिले आहे. सौदी अरबने हुती बंडखोरांसोबत युद्धविराम करण्यासाठी आणि सौदी अरबवरील हल्ले रोखण्यासाठी इराणच्या मध्यस्थीने एका करारांतर्गत त्यांना १ अब्ज डॉलरची आर्थिक पॅकेजची मदत देऊ केली आहे. बातमीनुसार या प्रस्तावाचा उद्देश्य सौदी अरबच्या पायाभूत ढाच्यावर हुतींचे हल्ले संपूर्णपणे रोखण्याचा आहे.

 

Source: TV9 Marathi International

Read full article on TV9 Marathi International

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language