टीम इंडियाची सलामीवीर एस. मेघनाने निवृत्ती घेतली आहे. अवघ्या ३० वर्षांच्या वयात तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मेघनाने भारतासाठी ३ एकदिवसीय आणि १७ टी-२० सामने खेळले आहेत
एस. मेघनाने २०१६ मध्ये पदार्पण केले, पण १० वर्षांत ती भारतासाठी केवळ ३ एकदिवसीय आणि १७ टी-२० सामने खेळली आहे. मेघनाने एकदिवसीय सामन्यांमध्ये ३८ च्या सरासरीने ११४ धावा केल्या, तर टी-२० मध्ये तिने २५८ धावा केल्या. तिने दोन्ही फॉरमॅटमध्ये प्रत्येकी १ अर्धशतक झळकावले आहे.
मेघनाने महिला प्रीमियर लीगमध्ये दोन संघांकडूनही खेळली आहे. तिने गुजरात जायंट्स आणि आरसीबीचे प्रतिनिधित्व केले. मेघनाने २३.२३ च्या सरासरीने ३०२ धावा केल्या.
निवृत्तीनंतरही मेघना क्रिकेटमध्ये सक्रिय राहणार आहे. निवृत्तीनंतर ती तरुण पिढीला मार्गदर्शन करण्यावर आणि क्रिकेट शिकवण्यावर लक्ष केंद्रित करेल, असे तिने सांगितले
स्मृती मानधना कर्णधार होताच अवघ्या काही दिवसांत दुसऱ्या खेळाडूने आपली निवृत्ती जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वी पुनम राऊतने आपली निवृत्ती जाहीर केली होती.
Source: TV9 Marathi Sports





