Hashtagintro

हजवरून आल्यावर ती बदलली, हिंदू धर्माला… अभिनेत्यानं सांगितलं फराहशी घटस्फोट घेण्याचं कारण

हजवरून आल्यावर ती बदलली, हिंदू धर्माला… अभिनेत्यानं सांगितलं फराहशी घटस्फोट घेण्याचं कारण

अभिनेता विंदू दारा सिंग सध्या त्याच्या खासगी आयुष्याबाबत चर्चेत आहे. त्याने पहिलं लग्न, घटस्फोट आणि मुलाच्या संगोपणावर पहिल्यांदाच मनमोकळं केलं आहे. विंदूचं पहिलं लग्न प्रसिद्ध अभिनेत्री फराह नाज सोबत झालं होतं. दोघे प्रेमात पडले, त्यानंतर त्यांनी लग्न केलं. पण काही वर्षानंतर दोघांनीही घटस्फोट घेतला. दोघांना घटस्फोट का घ्यावा लागला? फराह आणि त्यांच्यात असं काय झालं? लग्न दीर्घकाळ का टिकलं नाही? यावर विंदूने भाष्य केलं आहे. फराह हजवरून आल्यावर तिच्या आयुष्यात आणि विचार करण्याच्या पद्धतीत बदल झाला. दोघांमद्ये धर्मावरून वाद वाढत गेले. त्यामुळे दोघांनी घटस्फोट घेतला, असं विंदूचं म्हणणं आहे.

‘बिंदास बोल’ पॉडकास्टशी बोलताना विंदू दारा सिंगने आपल्या वैयक्तिक आयुष्याचे पत्ते खोलले आहेत. हजवरून आल्यावर फराहचा स्वभाव बदलला होता का? असा सवाल विंदूला विचारण्यात आला. त्यावर त्याने होय असं उत्तर दिलं. फराह हजवरून आल्यावर तिच्यात खूप बदल झाला होता. तिने इस्लाम धर्म पूर्णपणे स्वीकारण्याचा विचार सुरू केला होता. ती हिंदू धर्माला मानत नव्हती, असं विंदू म्हणाला. विंदू हा हिंदू आहे. सुरुवातीच्या काळात आमच्यात धर्माच्या मुद्द्यावरून वाद नव्हते. मी स्वत: पूजा पाठ करण्यावर विश्वास ठेवत नाही. फराह हजवरून आली आणि दोघांमध्ये ताणतणाव वाढले. आमचं लग्न प्रेमातून झालं होतं. सुरुवातीला सर्व काही चांगलं होतं. पण नंतर परिस्थिती बदलत गेली. हळूहळू मतभेद वाढत गेले. त्यामुळे आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला, असं विंदूने सांगितलं. यावेळी त्याने फराहबद्दल नाराजी व्यक्त करण्याऐवजी त्याने तिचं कौतुक केलं.

मुलाचं संगोपन करत असल्याबद्दल…

फराह ही एक चांगली आई आहे. तिने मुलाचं संगोपन अत्यंत चांगलं केलंय. त्यामुळे मी तिचा नेहमी आभारी राहील. माझा मुलगा अद्भूत आहे. तो सर्व धर्मांचा सन्मान करतो. माझा मुलगा बऱ्याचदा माझ्यासारखाच विचार करतो, असं विंदू म्हणाला. फराह आणि विंदूचं वैवाहिक नातं संपुष्टात आलं असलं तरी दोघांनीही मुलाचं संगोपन चांगलं केलं आहे.

हिंदू-मुस्लिम लग्नावर काय म्हणाला?

यावेळी त्याने हिंदू-मुस्लिम लग्नावरही आपलं मत व्यक्त केलं. अशा प्रकारच्या विवाहांवर आमच्या कुटुंबातील बुजुर्ग लोक नेहमीच चिंता व्यक्त करतात, असं तो म्हणाला. यावळी त्याने भारतीय इतिहास आणि धर्म परिवर्तन यावरही आपली मते मांडली. मुघलांच्या काळात तलवारीच्या जोरावर धर्मांतर केले जायचं. काही लोकांनी सामाजिक भेदभावातून दुसरा धर्म स्वीकारला. तर गरीबांच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांचं धर्मांतर करण्यात आलं, असंही त्यांनी सांगितलं. त्याच्या या दाव्यावर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

शोबिजपासून दूर

सध्या फराहा गेल्या काही काळापासून सिनेमा आणि टेलिव्हजनपासून दूर आहे. एकेकाळी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश होता. पण आता ती लाइमलाइटपासून दूर आहे. मीडिया आणि पॅपराजीपासूनही ती दूर आहे. आपलं वैयक्तिक आयुष्य ती शांतपणे जगत आहे. तर विंदू दारा सिंग अजूनही सिनेमासृष्टीत कार्यरत आहे. तो नेहमीच त्याच्या आयुष्याशी संबंधित किस्से शेअर करत असतो.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language