Hashtagintro

हातात मुलीचं घड्याळ, पायात ना बूट, ना चप्पल… मुलीच्या निधनानंतर पार खचला ‘हा’ अभिनेता पत्नीने केला खुलासा

हातात मुलीचं घड्याळ, पायात ना बूट, ना चप्पल… मुलीच्या निधनानंतर पार  खचला ‘हा’ अभिनेता पत्नीने केला खुलासा

दक्षिण भारतीय अभिनेता आणि संगीतकार विजय अँटनी यांच्या आयुष्यात 2023 मध्ये मोठं दु:ख आलं. त्यांची 16 वर्षांची मोठी मुलगी मीरा हिचं निधनं झालं. या घटनेला तीन वर्ष झाली. मात्र मुलीच्या जाण्याचं दु:ख विजय असूनही विसरू शकलेले नाहीत. मुलीच्या आठवणी जपण्यासाठी त्यांनी काही गोष्टी आपल्या आयुष्यात कायम ठेवल्या आहेत.मुलीच्या निधनांनंतर त्यांनी चप्पल आणि बूट घालणं जवळपास बंद केलं आहे. आता ते केवळ काही खास प्रसंगीच फुटवेअर घालतात. त्यांची पत्नी फातिमा यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात याबद्दल भावूक खुलासा केला आहे.

मुलीच्या चप्पला-बुटांनी भरलेली घरातील एक खोली

विजय अँटनी यांच्या ‘अप्पा कुट्टी’ या चित्रपटाच्या प्री -रिलीज कार्यक्रमात फातिमा यांनी हा किस्सा सांगितलां. मीरा हिच्यासाठी विजय आणि फातिमा यांनी अनेक वर्षांत भरपूर चप्पला आणि बूट खरेदी केले होते. लंडन, अमेरिका आणि इतर ठिकाणांहूनही तिच्यासाठी फुटवेअर आणले जात होते. मुलीचे इतते चपला – बूट जमा झाले आहेत की, आजही त्यांच्या घरातील एक खोली त्याच वस्तूंनी भरलेली आहे. मुलीचे हे चपला बूट पाहिल्यानंतर विजय यांनी स्वत: फुटवेअर न घालण्याचा निर्णय घेतला.आता ते केवळ काही खास औपचारिक प्रसंगीच बूट घालतात. अशा प्रकारे ते आपल्या मुलीच्या आठवणींशी जोडलेले राहतात.असं फातिंमा यांनी सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by JFW Binge (@jfwbinge)

 

 

मुलीचं घड्याळ आजही हातात

फातिमा यांनी विजय यांच्या घड्याळाबद्दलही एक भावूक गोष्ट सांगितली. विजय यांच्याकडे अनेक महागडी घड्याळं आहेत. मात्र ते रोज एक साधं घड्याळ घालणं पसंद करतात . ते घड्याळ मीराचं आहे. विजय यांनी शेवटच्या वेळी मीराला जेव्हा पाहिलं तेव्हा तिच्या हातात ते घड्याळ होत.तिच्या निधनानंतर त्यांनी ते घड्याळ स्वत:पासून कधीच दूर केलं नाही.

 

मुलीच्या निधनानंतर सार्वजनिक कार्यक्रमांपासूनही दूर

मीराच्या निधनानंतर फातिमा यांनीही चित्रपटांशी संबंधित कार्यक्रमांना जाणं टाळलं होतं. ‘ अप्पा कुट्टी’ च्या प्री रिलीज कार्यक्रमाला त्या अनेक वर्षांनंतर उपस्थित राहिल्या. विजय आणि फातिमा यांची धाकटी मुलगी लारा हिची देखील या उपस्थिती होती.

सप्टेंबर 2023 मध्ये चेन्नईतील घरात मीरा मृतावस्थेत आढळली . त्यावेळी ती अवघ्या 16 वर्षांची होती. तिच्यावर नैराश्यासाठी उपचार सुरू असल्याची माहीती समोर आली होती. मुलीच्या निधनानंतर विजय यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्टही केली होती. पोस्टमध्ये लिहिलं होतं कि, ‘ मीसुद्धा तिच्यासोबत मरण पावलो आहे. अशा शब्दात त्यांनी आपल्या दु:खाला वाट मोकळी करून दिली होती दरम्यान अप्पा कुट्टी हा चित्रपट वडिल आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे. मुलीच्या आठवणींशी जोडलेल्या या प्रसंगांमुळे विजय अँटनी यांच्या कुटुंबाचं दु:ख पुन्हा चर्चेत आलं आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language