Hashtagintro

ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांची शोरुममध्ये प्रचंड गर्दी, 31 दिवसांमध्ये 73,338 कारची विक्री

ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांची शोरुममध्ये प्रचंड गर्दी, 31 दिवसांमध्ये 73,338 कारची विक्री

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसाठी ऑक्टोबर 2026 हा महिना विक्रीच्या दृष्टीने विशेष ठरला आहे. कंपनीने या महिन्यात देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यात मिळून एकूण 1,31,109 वाहनांची विक्री केली. ऑक्टोबर 2025 च्या तुलनेत विक्रीत 9 टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, कंपनीच्या इतिहासातील ही आतापर्यंतची एका महिन्यातील सर्वाधिक विक्री आहे. सणासुदीच्या काळात वाहनांना मिळालेली मागणी आणि नव्या मॉडेल्समुळे कंपनीच्या विक्रीत वाढ झाल्याचे समोर आले आहे.

महिंद्राच्या SUV विभागानेही ऑक्टोबरमध्ये चांगली कामगिरी केली. कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेत एकूण 73,338 SUV ची विक्री केली. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये हाच आकडा 71,624 होता. त्यामुळे SUV विक्रीत वार्षिक आधारावर 2.39 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. निर्यातीसह कंपनीची एकूण युटिलिटी व्हेईकल विक्री 74,904 युनिट्सवर पोहोचली. तसेच आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेत 4,31,480 SUV विकल्या आहेत.

नवीन मॉडेल्सना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद

महिंद्रा ऑटोमोटिव्ह व्यवसायाचे अध्यक्ष डॉ. वेलुसामी आर यांनी या विक्रमी विक्रीचे श्रेय सणासुदीच्या काळातील वाहनांची वाढलेली मागणी आणि कंपनीच्या नवीन मॉडेल्सच्या श्रेणीला दिले. नुकतीच सादर करण्यात आलेल्या XUV 3XO ZNG या मॉडेललाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या मॉडेलच्या स्वतंत्र विक्रीचे आकडे कंपनीने जाहीर केलेले नाहीत.

SUV सोबतच महिंद्राच्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतही वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2026 मध्ये कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेत 33,037 लाइट कमर्शियल व्हेईकल्स (LCV) विकल्या. मागील वर्षाच्या तुलनेत या विक्रीत सुमारे 4 टक्क्यांची वाढ झाली आहे.

तीनचाकी वाहनांच्या विक्रीत 38 टक्क्यांची वाढ

महिंद्राच्या तीनचाकी वाहन विभागाने ऑक्टोबरमध्ये विशेष कामगिरी केली. इलेक्ट्रिक वाहनांसह कंपनीने एकूण 17,632 तीनचाकी वाहनांची विक्री केली. ऑक्टोबर 2025 मध्ये हा आकडा 12,762 होता. त्यामुळे या विभागाच्या विक्रीत तब्बल 38 टक्क्यांची वाढ झाली. या काळात तीनचाकी वाहनांच्या निर्यातीतही वाढ झाली आहे.

ट्रक आणि बस विक्रीत 40 टक्क्यांची वाढ

महिंद्राच्या ट्रक आणि बस विभागानेही चांगली कामगिरी नोंदवली. ऑक्टोबर 2026 मध्ये महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजन आणि SML महिंद्रा यांची एकत्रित विक्री 2,838 युनिट्सवर पोहोचली. ऑक्टोबर 2025 मध्ये ही विक्री 2,034 युनिट्स होती.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language