
सध्या क्रिकेटप्रमींना आयपीएलच्या नव्या हंगामाचे वेध लागले आहेत. क्रिकेटच्या खासकरुन भारतातल्या क्रिकेट चाहत्यांना दरवर्षी क्रिकेट टुर्नामेंट आयपीएलची प्रतिक्षा असते. यंदाच्या हंगामाचीही चाहते तशीच वाट पाहत आहेत. यंदा इंडियन प्रीमियर लीगचा तब्बल विसावा हंगाम आहे. या हंगामाच्या पार्श्वभूमिवर नुकताच रिटेन्शन सोहळा पार पडला. यावेळी स्पर्धेतील सर्व 10 संघांनी आपापले रिटेन आणि रिलिज खेळाडू यांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता आयपीएल 2027 च्या लिलावाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. परंतू त्यापूर्वीच आता सर्वात मोठ्या एका टीममध्ये मोठं काहीतरी घडत असल्याची कुणकुण लागली आहे. होय, मुंबई इंडियन्सने संघाचा मागिल कर्णधार हार्दिक पांड्याला रिलिज केलं आहे. हार्दिकनंतर मुंबई टीमचा कर्णधारपदी कोण बसणार, याची चर्चा जोर धरु लागलेली. याच चर्चांदरम्यान आणि लिलावाच्याआधीच रोहित शर्मा पुन्हा कर्णधार म्हणून समोर येणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
या चर्चांना कारणीभूत ठरत आहे, मुंबईने सोशल मीडियावर शेअर केलेले काही व्हिडिओ आणि फोटो. मुंबई इंडियन्सने काहीचवेळापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक तारीख दिसत आहे. ही तारीख 27.11.26 अशी आहे. तसेच व्हिडिओमध्ये मुंबईचं हेल्मेट दिसत असून धूळ उडताना दिसत आहे. एक कबुतरही खिडकीत बसलेलं आहे. तर सावल्यांचा खेळही या 10 सेकंदांच्या व्हिडिओत दिसतो आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी मुंबईच्या चाहत्यांनी मात्र रोहित शर्माचं नाव घेतलं आहे. आम्हाला मुंबईच्या राजाची प्रतिक्षा आहे, तोच उद्या येत आहे, असं चाहत्यांनी कमेंटमध्ये लिहिलं आहे.
View this post on Instagram
दरम्यान, कालही मुंबईने एक फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये हातात मुंबईची कॅप पकडलेला तो फोटो होता. या फोटोनंतरही चाहत्यांनी रोहित शर्माचंच नाव घतलं होतं. त्यामुळे आता रोहित शर्मा की आणखी कोण, हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी उद्या याचा सस्पेन्स संपणार आहे. हे सर्व कॅप्टनच्या नावाची घोषणा करणारे व्हिडिओ आणि फोटो आहेत, हे मात्र चाहत्यांनी नेमकेपणानं ओळखलं आहे. त्यामुळे उद्या नेमका कोणता चेहरा समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Source: TV9 Marathi Sports
