Hashtagintro

कॅनडातून मुंबईत हल्ला! लॉरेन्स बिश्नोई कसे चालवतो रॅकेट? भरती प्रक्रिया चर्चेचा विषय

कॅनडातून मुंबईत हल्ला! लॉरेन्स बिश्नोई कसे चालवतो रॅकेट? भरती प्रक्रिया चर्चेचा विषय

अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्याने बॉलिवूडला पुन्हा एकदा हादरवून गेले आहे. २०१८ मध्ये लॉरेन्स बिश्नोईने दिलेल्या पहिल्या धमकीपासून, त्याची टोळी गेल्या आठ वर्षांपासून चित्रपटसृष्टीतील कलाकारांसाठी भीती आणि दहशतीचा विषय बनली आहे. दरम्यान, या टोळीची कार्यपद्धती पुन्हा एकदा चर्चेत आहे. लॉरेन्स बिश्नोई कॅनडामध्ये राहतो आणि मुंबईत हल्ले करण्याचे रॅकेट कसे चालवतो? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी…

समोर आलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई आपल्या टोळीसाठी नेमबाजांची भरती करण्यासाठी इन्स्टाग्राम आणि फेसबुकचा वापर करतो. या प्लॅटफॉर्मवरील रील्स आणि व्हिडिओंद्वारे नवीन मुलांना आकर्षित केले जाते आणि नंतर टोळीत सामील होण्यासाठी त्यांचे ब्रेनवॉशिंग केले जाते. सध्या, या टोळीने १६ ते ३० वयोगटातील अंदाजे ९० नेमबाजांची भरती केली आहे.

नेमबाजांची कमतरता

गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, गोल्डी ब्रार, कला जथेरी आणि रोहित गोदारा निघून गेल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीला नेमबाजांची कमतरता भासू लागली. ही टोळी गुंडांच्या नावाने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर पेजेस, ग्रुप्स आणि प्रोफाइल्स तयार करते. त्यानंतर ते सक्रिय तरुणांवर लक्ष ठेवतात आणि त्यांच्या कमेंट्स पाहून विशिष्ट व्यक्तींना ओळखतात. टोळीचे सदस्य या तरुणांशी संपर्क साधतात, मग त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल माहिती गोळा करतात आणि त्यांचे ब्रेनवॉशिंग करतात.

पोलिस सूत्रांनी सांगितले की, टोळीत भरती होण्याची पारंपरिक पद्धत म्हणजे अनुभवी नेमबाजांकडून मिळणारी शिफारस. तुरुंगात असलेल्या साथीदारासोबतच्या बैठकांदरम्यानही नवीन तरुणांची शिफारस केली जाते. गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, एका विशिष्ट गुन्ह्यासाठी नेमबाजांची यादी तयार केली जाते. त्यानंतर बाईक, पैसे आणि पिस्तूल यांसारख्या आवश्यक उपकरणांची व्यवस्था केली जाते. शस्त्रे आणि दारूगोळा गुन्हेगारांपर्यंत पोहोचवला जातो. शस्त्र पुरवठादार आणि स्वीकारणाऱ्याला पूर्वनियोजित वेळ आणि ठिकाणाबद्दल स्नॅपचॅटद्वारे माहिती दिली जाते.

यापूर्वी कोणावर हल्ला झाला आहे?

अभिनेता सलमान खानला दिलेल्या धमक्यांच्या संबंधात अनेक अभिनेते आणि गायकांवर हल्ले झाले आहेत, आणि सलमान खानचे समर्थक मानले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांचीही हत्या झाली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीचे बॉलिवूडसोबतचे वैर २०१८ मध्ये सुरू झाले, जेव्हा लॉरेन्सने जोधपूर न्यायालयात हजर असताना सलमान खानला जीवे मारण्याची उघडपणे धमकी दिली. यानंतरही बिश्नोई टोळी थांबली नाही. उलट, त्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींना, विशेषतः सलमान खानशी संबंधित असलेल्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. एप्रिल २०२४ मध्ये, टोळीच्या सदस्यांनी सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थान, गॅलेक्सी अपार्टमेंट्सच्या बाहेर पाच गोळ्या झाडल्या. या घटनेने संपूर्ण चित्रपटसृष्टीला हादरवून सोडले.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language