
Saif Film : अभिनेत्री प्रियांका चोप्रा बऱ्याच काळाने भारतीय सिनेमांत दिसणार आहे.‘वाराणसी’ ही तिची अपकमिग फिल्म असून, अनेक वर्षांनी ती मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. एस. राजामौली या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून त्यात महेश बाबूची प्रमुख भूमिकाही आहे. याशिवाय प्रियांकाचं नाव सैफ अली खानच्या एका प्रोजेक्टशीदेखील निगडीत होती, ज्याचं दिग्दर्शन रितेश बत्रा करणार आहे. पीरियड ड्रामा असलेल्या या चित्रपटात प्रियांका काम करणार हौती, मात्र दुसऱ्या प्रोजेक्टमुळे तिचं काम होऊ शकली नाही आणि ती या चित्रपटातू बाहेर पडली. आता ती या चित्रपटाचा भाग नसेल अशी माहिती समोर आली आहे. या चित्रपटांचं मुंबईत शूटिंग सुरू झालं असून मोठी अपडेट समोर आली आहे. आता प्रियांका चोप्राऐवजी विद्या बालन या फिल्ममध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.
नुकतीच ‘मिड-डे’मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही दिग्दर्शक रितेश बत्रा यांच्या आगामी चित्रपटातून बाहेर पडल्याचं सांगण्यात आलं होतं. आता समोर आलेल्या नव्या वृत्तानुसार, या चित्रपटात सैफ अली खान आणि विद्या बालन ही जोडी एकत्र झळकणार आहे. अद्याप या चित्रपटाचं नाव निश्चित झालेलं नाही; मात्र चित्रपटाच्या कामाला सुरुवात झाली आहे.
काय असेल कहाणी ?
याच वृत्तानुसार, विद्या बालन आणि सैफ अली खान यांनी मुंबईत या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. कौटुंबिक पार्श्वभूमीवर आधारित ही एक प्रेमकथा असणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ अली खान आणि दिग्दर्शक रितेश बत्रा पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. यापूर्वी रितेश बत्रा यांनी इरफान खान यांच्या लोकप्रिय ‘द लंचबॉक्स’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.
तर सैफ अली खान आणि विद्या बालन यांनी आधी अनेक चित्रपटात काम केलं होतं. 2005 साली रिलीज झालेल्या ‘परिणीता’ मध्ये ते दोघे एकत्र दिसले होते. विद्या बालनची बॉलिवूडमधील ही पहिलीच फिल्म होती. तर त्यानंतर ते दोघे ‘एकलव्य: द रॉयल गार्ड’ या चित्रपटात पुन्हा एकत्र दिसले. विधु विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या फिल्ममध्ये अमिताभ बच्चन यांचीही प्रमुख भूमिका होती.
Source: TV9 Marathi Entertainment
