Hashtagintro

Magistrate Threatened CJP: सौरव, आशुतोष यांना जेलमध्ये पाठवणाऱ्या मॅजिस्ट्रेटला धमकी; रत्ना सिंह यांनी वेगळ्याच कटाचा केला आरोप

Magistrate threatened CJP Sourav Das case: कॉकरोच जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवस न्यायालयीन कोठडीत पाटवणाऱ्या स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट अर्थात SEM यांना धमकी देण्यात आली आहे. आता पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूद्ध एफआयआर दाखल केली आहे. SEM यांना आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या जामीन प्रकरणात धमकी मिळाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी जंतर मंतरवर दास आणि रांका यांनी तिरंगा फडकावला म्हणून त्यांना ५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं.

एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांनी या बाबत एक एफआयआर दाखल केली आहे. यापूर्वी पोलीसांनी एनसीआर दाखल केली होती. सहसा किरकोळ गुन्ह्यासाठी एनसीआर दाखल करण्यात येते. अशा गुन्ह्यासाठी कायद्यानुसार पोलीस आरोपीला वॉरंटशिवाय अटक करू शकत नाही. तसेच मॅजिस्ट्रेटच्या परवानगीशिवाय चौकशी देखील करू शकत नाही.

काय म्हणाली CJP?

दरम्यान, सीजेपीच्या कायदेशीर बाबी पाहणाऱ्या रत्ना सिंह यांनी सांगितलं की, ‘SEM यांनी त्यांना धमकी आल्याचं सांगितलं. आमच्या वकिलांनी त्यांना जर तुम्हाला धमकी आली आहे तर तुम्ही त्याच्याविरूद्ध कारवाई करा. आदेशात त्याचा मोबाईल नंबर द्या. आम्हाला त्याचे नाव सांगा.’ अशी मागणी केली होती.

आमच्या वकिलांनी त्यांच्या युक्तीवादाचा विरोध केला होता. त्यांनी तुम्ही धमकी देणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कारवाई करायला पाहिजे. तुम्ही या प्रकरणाची सुनावणी का करत नाहीये असा देखील सवाल त्यांनी विचारला होता.

सरकारी वकिलांवर गंभीर आरोप

रत्ना सिंह यांनी आरोप केला की, सुनावणी दुपारी १२ वाजता होणार होती. मात्र त्याला खूप उशीर झाला. एसईएम आणि सरकारी वकील सायंकाळी साडे पाच वाजता आले. त्यांनी रांका आणि दास यांच्या सुटकेवर विचार करण्याऐवजी ही कार्यवाही मॅजिस्ट्रेट यांना मिळालेल्या कथित धमकीकडे वळवली.

सिंह म्हणाल्या की, सलग चार दिवस पेश न होणाऱ्या सरकारी वकिलांनी आज अचानक एन्ट्री केली अन् त्यांनी कथित धमकीच्या विषयाकडे चर्चा वळवण्याचा प्रयत्न केला. त्यांची सुटकी होऊ नये म्हणून जो कट रचला गेला आहे आज हा कट पूर्णपणे उघड झाला आहे. हे आम्ही सर्वांनी पाहिलं आहे. आज या प्रकरणी कोणतीही चर्चा झाली नाही. या प्रकरणी कोणताही युक्तीवाद झाला नाही.

सरकारचा हा कट

रत्ना सिंह यांनी सांगितलं की, ‘ही अवैध अटक असून राज्य सरकारने हा कट रचला आहे. दिल्ली पोलीसांचा हा कट असून सौरव आणि आशुतोष यांना जेलमध्ये ठेवण्यासाठी हे सर्व केलं जात आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language