Hashtagintro

Indian Air Force : इंडो-पॅसिफिकमधील घडामोडींवर भारताचे बारकाईने लक्ष; राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी हवाई दल सज्ज

Indian Air Force: इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अलीकडील घडामोडींमुळे अधिक सतर्क राहण्याची आणि प्रादेशिक सहकार्य वाढवण्याची गरज आहे. भारताचे राष्ट्रीय हित, सार्वभौमत्व आणि कृती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज आहे, असे हवाई दल प्रमुख ए. पी. सिंग यांनी रविवारी स्पष्ट केले. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींबाबत जागतिक स्तरावर चिंता व्यक्त होत असताना त्यांनी हे विधान केले.
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ए. पी. सिंग म्हणाले की, इंडो-पॅसिफिक क्षेत्र जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. या भागात लष्करी हालचाली वाढत असून सामरिक स्पर्धा आणि संघर्षाचे वातावरणही दिसून येत आहे. भारतीय हवाई दल या प्रदेशातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
https://www.prahaar.in/2026/10/25/important-news-for-pune-lonavala-local-train-passengers-4-local-trains-cancelled-changes-to-the-schedules-of-express-trains/
अलीकडील परिस्थिती लक्षात घेता सतर्कता, प्रभावी प्रतिबंधक क्षमता आणि प्रादेशिक देशांमधील सहकार्य वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. उद्भवणारी आव्हाने वेळीच ओळखून त्यांना सामोरे जाण्यास सक्षम असलेले हवाई दल उभारण्यावर भारताचा भर आहे. विविध क्षेत्रांमध्ये समन्वयाने कार्य करून आवश्यक परिणाम साधण्याची क्षमता विकसित केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख
ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देताना ए. पी. सिंग यांनी सांगितले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेली कारवाई ही भारतीय हवाई दलाच्या क्षमता-केंद्रित दृष्टिकोनाची पुष्टी होती.
यापुढे केवळ स्वतंत्र विमानांच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी संपूर्ण यंत्रणा एकत्रितपणे कार्य करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक विमान, सेन्सर, शस्त्र आणि नेटवर्क यांचा समन्वय साधल्यास त्यांची एकत्रित क्षमता अधिक प्रभावी ठरते, असेही ते म्हणाले.
इंडो-पॅसिफिकमधील बदलत्या सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत आपल्या संरक्षण क्षमतांमध्ये सुधारणा करत असून, राष्ट्रीय हितांचे रक्षण करणे हे भारतीय हवाई दलाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे ए. पी. सिंग यांनी स्पष्ट केले.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language