Hashtagintro

काय घंटा राहणार हातात? मनोज जरांगे पाटील यांनी उडवली 5000 रुपये मदतीची खिल्ली; गणितच मांडलं

काय घंटा राहणार हातात? मनोज जरांगे पाटील यांनी उडवली 5000 रुपये मदतीची खिल्ली; गणितच मांडलं

राज्य सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 5 हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सरकारच्या या सरकारी मदतीची मनोज जरांगे पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. तुम्ही शेतकऱ्यांना 5 हजार रुपये मदत देता, पण बँकेत मदतीच्या पैशासाठी आठ दिवस चक्कर मारली तर त्यातच हे पैसे खर्च होतील. शेतकऱ्यांच्या हातात काय घंटा राहील? अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या मदतीचा समाचार घेतला आहे.

बीडच्या नारायण गडावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मनोज जरांगे पाटील यांनी या मोर्चाला संबोधित करताना राज्य सरकारच्या सरकारी मदतीची खिल्ली उडवलीच पण ही मदत कशी हातात उरणार नाही, याचं गणितच मांडलं. सरकारने 5 हजार रुपये मदत दिली आहे. पण हे पैसे बँकेतून काढण्यासाठी आठ दिवस बँकेत चक्कर मारावी लागणार आहे. रोज बँकेत जाण्यासाठी येण्याजाण्याचा खर्च 200 रुपये होणार आहे. म्हणजे प्रवास खर्चावरच आठ दिवसात 2 हजार रुपये खर्च होणार आहे. म्हणजे हातात 3 हजार रुपयेच उरणार आहेत. त्यात सकाळचा नाश्ता आणि जेवणावर 200 रुपये जाईल, दुपारच्या जेवणावर 200 रुपये जाईल. म्हणजे जेवणावर 3200 रुपये खर्च होणार आहे. मग काय हातात घंटा राहिल? असा हिशेबच मनोज जरांगे पाटील यांनी मांडला.

हेक्टरी एक लाख मदत हवी

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये देण्याची मागणी केली आहे. राज्यात भयानक दुष्काळ आहे. शेतकऱ्यांची पिकं जळून गेली आहेत. शेतात काही उरलं नाही. त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता पुढचं आंदोलन आपल्याला शेतकऱ्यांसाठी करायचं आहे. एक लाख रुपये हेक्टरी मदत मिळवायचीच आहे, असं जरांगे म्हणाले.

मुंबईला जाण्याची तयारी करा

दुष्काळाची विदारकता वाढली नाही तर मुंबईला जाण्याच्या तयारीला लागा. ज्या दिवशी हाक मारेन त्या दिवशी मुंबईला या. इथे बसलेल्या एका एकाने दहा दहा गाड्या काढा. पुन्हा एकदा आपल्याला आरक्षणाच्या मुद्द्यावर उभं राहायचं आहे, असं सांगतानाच आमच्या विरोधात बोलताना इथून पुढे मर्यादेत राहून बोला. मर्यादा मराठ्यांनाच नाही तर समोरच्यांनाही असली पाहिजे. नाही तर जसेच्या तसे उत्तर देऊ, असा इशाराच त्यांनी दिला.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language