Hashtagintro

Ind vs NZ : एवढा मोठा रनचेज करुन टीम इंडियानं विजय मिळवला तरी कसा? संजू सॅमसननं रहस्य सांगून टाकलं

Ind vs NZ : एवढा मोठा रनचेज करुन टीम इंडियानं विजय मिळवला तरी कसा? संजू सॅमसननं रहस्य सांगून टाकलं

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने विक्रमी विजय मिळवला. भारताच्या या विजयाचा हिरो ठरला तो म्हणजे संजू सॅमसन. उजव्या हाताच्या या फलंदाजाने अवघ्या 33 चेंडूंमध्ये 67 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडने दिलेल्या 226 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. भारताने 2 चेंडू राखून हा सामना जिंकला. या विजयासह संजू सॅमसनने एका खास वर्ल्ड रेकॉर्डलाही गवसणी घातली आहे.

संजूने कोणाला दिलं विजयाचं श्रेय?

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शानदार खेळ केल्यानंतर संजू सॅमसनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. यावेळी त्याने आपल्या खेळीबद्दल भाष्य करताना विजयाचं रहस्यही सांगितलं. यष्टीरक्षक म्हणून मैदानावर असताना खेळपट्टीचा अंदाज घेण्यास मदत होते, असं त्याने सांगितलं. मात्र, क्राइस्टचर्चमध्ये दुसऱ्या डावात खेळपट्टी बदलली होती, असं तो म्हणाला.

संजू म्हणाला, “यष्टीरक्षण करताना या खेळपट्टीवर फलंदाजी कशी करायची, याचा मी विचार करत होतो. मात्र, प्रत्यक्ष फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. पहिल्या डावात चेंडू थोडा थांबून येत होता. पण दुसऱ्या डावात चेंडू बॅटवर चांगल्या प्रकारे येऊ लागला. हे सगळं दवामुळे झालं. मी फलंदाजीचा पूर्ण आनंद घेतला. तशीच फलंदाजी इतरांनीही केली. ”

सोशल मीडियावरील चर्चांचा फरक पडत नाही

संजू सॅमसनने यावेळी सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चांबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. लोक काय बोलतात, याचा आपल्यावर परिणाम होत नसल्याचं त्याने सांगितलं. कोणाला चुकीचं सिद्ध करण्यासाठी आपण क्रिकेट खेळत नसल्याचंही संजूने स्पष्ट केलं.

“लोक काय म्हणतात, याची मला पर्वा नाही. भारतासाठी खेळणं सोपं नाही. यामध्ये खूप चर्चा आणि गोंधळ असतो. प्रत्येकाचं स्वतःचं मत असतं. सोशल मीडियावर लोक काय म्हणतात, याकडे मी लक्ष देत नाही. माझा स्वतःच्या खेळावर विश्वास आहे. मी त्याचा आदर करतो आणि क्रिकेट खेळण्यावर लक्ष केंद्रित करतो. कोणाला चुकीचं सिद्ध करण्याच्या विचाराने मी खेळत नाही,” असं संजू सॅमसनने सांगितलं.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच टी-20 सामन्यात संजूने फलंदाजीतील आपली ताकद दाखवून दिली. त्याच्या या खेळीमुळे भारताला विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करण्यात मदत झाली, तर वैयक्तिक कामगिरीतही त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

संजू सॅमसनचा खास वर्ल्ड रेकॉर्ड

संजू सॅमसनने टी-20 क्रिकेटमध्ये 200 पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने सर्वाधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावांची खेळी करणारा यष्टीरक्षक म्हणून विक्रम आपल्या नावावर केला आहे. संजूने आतापर्यंत 7 वेळा 200 पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या यादीत इंग्लंडचा जोस बटलर दुसऱ्या क्रमांकावर असून, त्याने 6 वेळा अशी कामगिरी केली आहे. तर क्विंटन डी कॉकने 4 वेळा, शाई होप आणि फिल सॉल्ट यांनी प्रत्येकी 3 वेळा अशी खेळी केली आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language