Hashtagintro

Nitesh Rane: तलावातील गाळ काढण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, मंत्री नितेश राणे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तलावांतील गाळ काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन त्याचे सूक्ष्म नियोजन करावे. तलावांतील गाळ काढल्यामुळे पाणीसाठवण क्षमता वाढण्यास मदत होईल. तसेच गाळाचा शेतीसाठी वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढण्यास हातभार लागेल. या माध्यमातून मत्स्यव्यवसायालाही चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.
https://www.prahaar.in/2026/10/23/yugandhara-yuvati-sammelan-2026-navi-mumbai-mayor-sujata-patil-speech/
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळी परिस्थितीच्या आयोजित आढावा बैठकीत मंत्री राणे बोलत होते. यावेळी आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त भानुदास पालवे, नाशिकचे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय संजय पाटील यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. मंत्री नितेश राणे म्हणाले, सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकरी आणि मच्छिमार बांधवांना दिलासा देण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करणे आवश्यक आहे. शासन शेतकरी तसेच मच्छिमार बांधवांच्या पाठीशी असून, त्यांना आवश्यक मदत आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे.
https://www.prahaar.in/2026/10/23/state-government-steps-forward-to-assist-the-fishing-community-minister-nitesh-rane-learns-about-the-issues-faced-by-them/
अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तलावांतील गाळ काढण्याची विशेष मोहिम राबवावी. या मोहिमेचा सविस्तर आराखडा तयार करून कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. तलावांमधून काढण्यात येणाऱ्या गाळाचा शेतीसाठी उपयोग करण्यावर भर द्यावा. त्यामुळे शेतजमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर तलावांची पाणी साठवण्याची क्षमता वाढविण्यास आणि मत्स्यव्यवसायासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी आणि मच्छिमार बांधवांना दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना, मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना आणि किसान क्रेडिट कार्ड यांसारख्या केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून द्यावा, असे निर्देशही नितेश राणे यांनी दिले.
https://www.prahaar.in/2026/10/23/kumbhmela-minister-girish-mahajan-meets-maharashtra-governer-jishnu-dev-verma-and-invite-flag-hoisting-ceremony-of-the-simhastha-kumbh-mela/
या योजनांची माहिती संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी विशेष प्रयत्न करावेत. जिल्हाधिकाऱ्यांनी नियमित बैठका घेऊन योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थितीत पाणीसाठ्यांचे योग्य व्यवस्थापन, तलावांतील गाळ काढण्याचे नियोजन आणि शासकीय योजनांचा लाभ यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language