Hashtagintro

Kazakhstan Charter Flight | कझाकस्तानहून आलेल्या पहिल्या चार्टर विमानाचे दाबोळी विमानतळावर पर्यटन खात्याकडून दिमाखदार स्वागत

पणजी : पुढारी वृत्तसेवा
कझाकस्तानहून आलेल्या ‘पहिल्या चार्टर विमानाचे’ शनिवारी पर्यटन खात्यातर्फे स्वागत करण्यात आले. १८९ प्रवाशांना घेऊन हे विमान दाबोळी विमानतळावर दाखल झाले.
या आगमनामुळे गोव्याच्या आंतरराष्ट्रीय पर्यटन विस्ताराला बळकटी मिळाली असून, मध्य आशियाई पर्यटकांमध्ये गोव्याचे आकर्षण अधिक दृढ झाले आहे.

याबाबत पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले, या हंगामासाठी कझाकस्तानहून ‘स्कॅट एअरलाईन्स’चे पहिले चार्टर विमान येणे, ही गोव्याच्या आंतरराष्ट्रीय पर्यटन विस्ताराच्या दृष्टीने एक उत्साहवर्धक घटना आहे. कझाकस्तान आणि संपूर्ण मध्य आशियाई प्रदेशासोबत संबंध अधिक दृढ करण्याची आणि तिथून अधिक आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे स्वागत करण्याची संधी आपल्याला मिळत आहे.

आमचा भर आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढविण्यावर आहे. त्याचबरोबर गोव्यातील वैविध्यपूर्ण पर्यटन अनुभव, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि वैशिष्ट्यपूर्ण आतिथ्य जगासमोर मांडण्यावरही आमचा विशेष भर आहे.

हे आगमन आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्याच्या आणि पारंपारिक बाजारपेठांच्या पलीकडे पर्यटनाचा विस्तार करण्याच्या गोव्याच्या निरंतर प्रयत्नांना अधोरेखित करते.

गोवा परदेशी पर्यटकांसाठी उत्तम ठिकाण : मंत्री खंवटे

वारसा, संस्कृती, खाद्यसंस्कृती, आरोग्यदायी (वेलनेस) अनुभव, निसर्गरम्य परिसर आणि आदरातिथ्य यांचे अनोखे मिश्रण असलेला गोवा, वैविध्यपूर्ण सुट्टीचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून स्वतःला प्रस्थापित करत आहे, असे मंत्री खंवटे यांनी सांगितले.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language