Hashtagintro

Vande Bharat Sleeper Express: 'वाराणसी जंक्शन– नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस' उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत, कसं असेल वेळापत्रक?

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी ‘वाराणसी जंक्शन– नवी दिल्ली वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस’ला हिरवा कंदील दाखवला. उद्यापासून ही एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे. 27421 डाऊन आणि 27422 अप ‘वाराणसी जंक्शन– नवी दिल्ली– वाराणसी जंक्शन वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस’ 2 नोव्हेंबरपासून पुढील वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहे. ही वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस वाराणसी जंक्शनवरून आठवड्यातून शुक्रवार वगळता आठवड्यातील इतरत्र सहा दिवस आणि नवी दिल्लीवरून शनिवार वगळता आठवड्यातील इतरत्र सहा दिवस प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/01/regular-service-start-varanasi-new-delhi-vande-bharat-sleeper-train-up-cm-yogi-adityanath-and-railway-minister-ashwini-vaishnaw-flag-it-off/
कशा पद्धतीने ह्या एक्स्प्रेसचं संपूर्ण वेळापत्रक असेल, जाणून घेऊया… 27421 डाऊन वाराणसी जंक्शन– नवी दिल्ली वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस ही दररोज, वाराणसी जंक्शनवरून रात्री 08.50 वाजता सुटेल आणि सकाळी 06.10 वाजता नवी दिल्ली स्थानकावर पोहोचेल. प्रवासादरम्यान, ही गाडी प्रयागराज जंक्शनवर रात्री 10.40 वाजता पोहोचेल, तर दुसऱ्या दिवशी कानपूर सेंट्रल स्थानकावर मध्यरात्री 12.45 वाजता पोहोचेल, अलीगड स्थानकावर मध्यरात्री 03.57 वाजता पोहोचेल आणि गाझियाबाद स्थानकावर पहाटे 05.25 वाजता पोहोचेल. ह्या एक्स्प्रेसची सुविधा प्रवाशांना 2 नोव्हेंबर 2026 पासून मिळणार आहे. ही सेवा प्रवाशांना शुक्रवार वगळता आठवड्यातील इतरत्र सहा दिवस उपलब्ध असेल.
https://www.prahaar.in/2026/11/01/singer-and-rapper-yo-yo-honey-singhs-nephew-visit-old-dies-in-jalandhar-car-accident-singer-shared-on-instagram-heartbreaking-note/
परतीच्या प्रवासाबद्दल सांगायचे तर, 27422 अप नवी दिल्ली– वाराणसी जंक्शन वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस नवी दिल्लीवरून दररोज रात्री 09.40 वाजता सुटेल आणि सकाळी 07.10 वाजता वाराणसी जंक्शनवर पोहोचेल. प्रवासादरम्यान, ही एक्स्प्रेस गाझियाबाद स्थानकावर रात्री 10.15 वाजता पोहोचेल. अलीगड स्थानकावर रात्री 11.22 वाजता पोहोचेल. कानपूर सेंट्रल स्थानकावर मध्यरात्री 02.50 वाजता ही एक्स्प्रेस पोहोचेल. प्रयागराज जंक्शनवर ही एक्स्प्रेस पहाटे 05.10 वाजता पोहोचेल. ही सेवा 2 नोव्हेंबर 2026 पासून शनिवार वगळता आठवड्यातील इतरत्र सहा दिवस प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहे. या एक्स्प्रेसमध्ये, प्रवाशांसाठी 16 कोचेस असतील, त्यामध्ये एक कोच फर्स्ट क्लास एसी, 4 सेकंड क्लास एसी कोच आणि उर्वरित 11 थर्ड क्लास एसी कोच असतील.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language