Hashtagintro

Israel PM Election 2026 : जगाचं लक्ष इस्रायलच्या निवडणुकीकडे, बेंजामिन नेतन्याहू यांना सत्तेवरुन खाली खेचण्याची ताकद असलेले गादी आइजेनकोट कोण?

Israel PM Election 2026 : जगाचं लक्ष इस्रायलच्या निवडणुकीकडे, बेंजामिन नेतन्याहू यांना सत्तेवरुन खाली खेचण्याची ताकद असलेले गादी आइजेनकोट कोण?

सध्या जागतिक राजकारणात इस्रायलच्या निवडणुकीची चर्चा आहे. कारण जागतिक राजकारणातील बऱ्याच महत्वाच्या घडामोडी या निवडणूक निकालावर अवलंबून आहेत. पश्चिम आशियातील तापलेल्या राजकारणाचं पुढे काय होणार,हे बऱ्याच प्रमाणात या निवडणूक निकालावर अवलंबून आहे. सध्या इस्रायलच्या राजकारणात एक मोठा बदल पहायला मिळतोय. एरवी इस्रायलच्या राजकारणाचा विषय निघाला की, एकच नाव समोर येतं बेंजामिन नेतन्याहू. पण सध्या बेंजामिन नेतन्याहू यांच्या राजकीय अस्तित्वासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. इस्रायलमध्ये बेंजामिन नेतन्याहू यांच्यासमोर माजी सैन्य प्रमुख गादी आइजेनकोट तितक्याच ताकदीने उभे राहिले आहेत. जनमत चाचणीत आइजेकनकोट यांच्या याशार पार्टीला चांगला पाठिंबा मिळतोय. त्यांनी नेतन्याहू यांच्या लिकुड पार्टीसमोर चॅलेंज निर्माण केलय. हे गादी आइजेनकोट कोण आहेत? त्यांची लोकप्रियता वाढण्यामागचं कारण काय? आणि इस्रायली राजकारणात त्यांच्या येण्याने काय बदल घडू शकतो? ते जाणून घ्या.

गादी आइजेनकोट इस्रायलचे माजी सैन्य प्रमुख आहेत. इस्रायली सैन्य दलात त्यांनी 41 वर्ष सेवा केली आहे. 2015 ते 2019 दरम्यान इस्रायली डिफेन्स फोर्सेजच्या चीफ ऑफ स्टाफ पदावर ते होते. रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासमोर मजबूत राजकीय पर्याय म्हणून ते उभे राहिले आहेत. सुरक्षा, सैन्य अनुभव आणि नेतन्याहू यांचं नेतृत्व बदलणं यावर त्यांचा प्रचार केंद्रीत आहे. नेतन्याहू यांच्याप्रमाणे ते दीर्घकाळ इस्रायलच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी नव्हते ही एक आइजेकोट यांच्या जमेची एक बाजू आहे. एक सैन्य अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा साधेपणा आणि थेट बोलण्याची शैली यामुळे ते दुसऱ्या नेत्यांपेक्षा वेगळे ठरतात.

7 ऑक्टोंबर 2023 च्या हल्ल्यानंतरची पहिली सार्वत्रिक निवडणूक

पॅलेस्टाइन, हमास आणि इराण या मुद्यावर नेतन्याहू यांची भूमिका सुद्धा आइजेनकोट यांच्या इतकीच कठोर आहे. आज 27 ऑक्टोंबरला इस्रायलमध्ये निवडणूक होत आहे. 7 ऑक्टोंबर 2023 रोजी हमासवर झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये होणारी ही पहिली सार्वत्रिक निवडणूक आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी 2023 मध्ये केलेल्या हल्ल्यात 1200 नागरिकांचा मृत्यू झालेला. 251 नागरिकांना बंधक बनवलेलं. त्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीत एक व्यापक सैन्य मोहिम सुरु केलेली. आइजेनकोट यांनी इस्रायलची सुरक्षा व्यवस्था आणि नेतन्याहू यांच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

Source: TV9 Marathi International

Read full article on TV9 Marathi International

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language