Hashtagintro

India-Maldives : भारताला धोका वाटला तर परिणाम भोगावे लागतील, पाकिस्तान सोबत जवळीकी नंतर मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना मायदेशातच इशारा

India-Maldives : भारताला धोका वाटला तर परिणाम भोगावे लागतील, पाकिस्तान सोबत जवळीकी नंतर मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना मायदेशातच इशारा

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू नुकतेच पाकिस्तान दौऱ्यावर गेले होते. त्यांच्या या दौऱ्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. मुइज्जू यांना त्यांच्याच देशात काही गोष्टी ऐकाव्या लागत आहेत. विरोधी पक्षाचे नेते भारताचं नाव घेऊन इशारे देत आहेत. पाकिस्तान सोबत संरक्षण संबंध बळकट करण्याच्या प्रयत्नामुळे भारतासोबतच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो. मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद म्हणाले की, ‘भारताला जर असं वाटलं की, त्यांच्या सुरक्षेसोबत तडजोड होतेय तर मालदीवला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील’

मुइज्जू पाकिस्तान दौऱ्यावर अशावेळी गेले, जेव्हा मालदीव भारतासोबत संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. भारत-पाकिस्तानमध्ये आधीच खराब संबंध आहेत. त्यात पाकिस्तानला सहकार्य केल्यास मालदीव फुकटमध्ये यात अडकू शकतो, अशी भिती तिथल्या विरोधी पक्षांना आहे. 11 वर्षानंतर मालदीवच्या राष्ट्रपतींनी पाकिस्तानचा दौरा केला. यावेळी दोन्ही देशांमध्ये एकूण 20 करारावर एकमत झालं. मुइज्जू 20 ते 22 ऑक्टोंबर दरम्यान तीन दिवसीय मालदीव दौऱ्यावर गेले होते. 11 वर्षात मालदीवच्या कुठल्या राष्ट्राध्यक्षांनी केलेला हा पहिला दौरा होता. दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंधांना 60 वर्ष पूर्ण होत असताना मुइज्जू पाकिस्तान दौऱ्यावर गेले होते.

परस्परांच्या हिताशी संबंधित क्षेत्रात सहकार्य करणार

दोन्ही देश परस्परांच्या हिताशी संबंधित क्षेत्रात सहकार्य करणार आहेत. द्विपक्षीय व्यापार जो सध्या 1.3 कोटी डॉलर आहे, तो वाढवून 20 कोटी डॉलरपर्यंत नेण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाने ही माहिती दिली. सुरक्षा आणि संरक्षण सहकार्यावर सर्वात जास्त चर्चा झाली. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, राष्ट्रपती असीफ अली झरदारी आणि लष्करप्रमुख असीम मुनीर या्ंची मुइज्जू यांनी भेट घेतली. सुरक्षा, संरक्षण सहकार्य आणि सैन्य प्रशिक्षण सारखे मुद्दे यामध्ये होते.

नशीद यांनी पत्रकार परिषदेतून काय आरोप केला?

मालदीवच्या विरोधी पक्षाचे मालदीवियन डेमोक्रेटिक पार्टीचे (एमडीपी) अध्यक्ष आणि माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी मुइज्जू यांच्या पाकिस्तान दौऱ्यावर कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. मुइज्जू यांनी कुठलाही विचार न करता भारत-पाकिस्तानमध्ये दीर्घकाळापासून सुरु असलेल्या संघर्षात स्वत:ला केंद्रस्थानी आणलं आहे असा नशीद यांनी पत्रकार परिषदेतून आरोप केला.

..तर मालदीवला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील

“छोटे देश खासकरुन मालदीवसमोर अनेक आव्हानं आहेत. पाकिस्तान सोबत संबंध पुढे नेताना भारताच्या सुरक्षा चिंतांकडे दुर्लक्ष करणं महाग पडू शकतं. भारताला जर असं वाटलं की, त्यांच्या सुरक्षेसोबत तडजोड होतेय तर मालदीवला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील” असं नशीद म्हणाले.

 

Source: TV9 Marathi International

Read full article on TV9 Marathi International

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language