Hashtagintro

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी चुरशीची लढत, मतमोजणीत संमिश्र चित्र

मुंबई: विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांच्या निवडणुकीच्या मतमोजणीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात महायुतीचे सुधाकर कोहळे यांनी पहिल्या फेरीत निसटती आघाडी घेतली, तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघात प्रतापसिंह पाटील हे सतीश चव्हाण यांच्यापेक्षा तीन हजार मतांनी पुढे होते. अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीचे किरण सरनाईक आघाडीवर असून काँग्रेसच्या अदिती पोहरे यांना पहिल्या पसंतीची 1 हजार 319 मते मिळाली. पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख यांनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडी घेतली आहे.
https://www.prahaar.in/2026/10/27/how-many-trees-were-cut-down-for-the-karjat-farmhouse-bjp-leader-navnath-ban-asks-aaditya-thackeray-during-a-press-conference/
शुक्रवारी मतदान झाल्यानंतर मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून पाचही मतदारसंघांतील मतमोजणीला सुरुवात झाली. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत अपेक्षित असताना पहिल्या फेरीत सुधाकर कोहळे यांनी निसटती आघाडी घेतली. या फेरीत सुमारे 84 हजार मतपत्रिकांची मोजणी अपेक्षित असून, वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत मतमोजणी सुरू होती. त्यामुळे अंतिम निकालाबाबत स्पष्टता आलेली नव्हती.

पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक चुरस
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात प्रतापसिंह पाटील यांनी सतीश चव्हाण यांच्यावर तीन हजार मतांची आघाडी घेतल्याची माहिती समोर आली. या मतदारसंघातील लढतीकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीचे किरण सरनाईक यांनी पहिल्या फेरीतील मतमोजणीत आघाडी घेतली. उपलब्ध आकडेवारीनुसार सरनाईक यांना 3 हजार 903 मते मिळाली. शिवसेनेतील बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना 2 हजार 209, अपक्ष सुरेश देवकर यांना 1 हजार 582, काँग्रेसच्या अदिती पोहरे यांना 1 हजार 319, तर उबाठाचे दत्तात्रय लहाने यांना 1 हजार 169 मते मिळाली. भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे यांना 698, तर शेखर भोयर यांना 432 मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागल्याचे चित्र होते.
https://www.prahaar.in/2026/10/26/minister-radhakrishna-vikhe-advises-mahayuti-leaders-to-exercise-restraint-regarding-the-alleged-500-crore-audio-clip/
पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात चुरस पहायला मिळत आहे. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये हर्षदा देशमुख आघाडीवर होत्या. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडीवर दिसून आले. अद्याप मतमोजणी सुरू असल्याने आकड्यांमध्ये बदल होण्याची शक्यता असून अंतिम निकालानंतरच महायुती आणि महाविकास आघाडीचे नेमके यश स्पष्ट होणार आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language