नवी दिल्ली: सौदी अरेबियातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सौदी अरेबियामध्ये मंगळवारी (27 ऑक्टोबर) सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये असलेल्या संरक्षण मंत्रालयालवर बॅलिस्टिक मिसाईल टाकून हल्ला करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. या हल्ल्याची जबाबदारी येमेनच्या हुती गटाने घेतली आहे.
हुती गटाचा प्रवक्ता याह्या सारीने दिलेल्या माहितीनुसार, ‘आमच्या गटाने आमचा शत्रू असलेल्या सौदी अरेबिया देशाच्या राजधानीवर रियाधमध्ये संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला आहे. हा हल्ला आम्ही थेट निशाण्यावरच केलेला आहे.’ मंगळवारी सकाळी येमेनच्या हुती गटाने दोन क्षेपणास्त्रे टाकून अचानक सौदी अरेबियाच्या मंत्रालयावर हल्ला केला. सौदी अरेबियातील वृत्तसंस्था एएफपीच्या वृत्तानुसार, रियाधमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाजही ऐकू आले.
https://www.prahaar.in/2026/10/27/triple-murder-in-lucknow-following-a-parking-dispute-after-killing-the-three-victims-the-accused-remained-seated-next-to-the-bodies/
हुती गटाने होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेला आखाताच्या किनाऱ्यावर असलेल्या सौदी अरेबियाच्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि रास तानुराला लक्ष्य केल्याचा दावाही करण्यात आला आहे. हुती गटाचे लष्करी प्रवक्ते याह्या सारीने यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुती गटाने सौदी अरेबियाच्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले, ज्यामुळे आग लागली. अद्याप, या हल्ल्याविषयी सौदी अरेबियाच्या सरकारने किंवा कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हल्ल्याची पुष्टी केलेली नाही.
सौदी अरेबिया आणि येमेनमधील हुती (ज्यांना इराणचा पाठिंबा आहे) गटातील संघर्ष सप्टेंबर महिन्यापासून अधिक तीव्र झाला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या तणावानंतर ही परिस्थिती अधिक चिघळली आहे.
https://www.prahaar.in/2026/10/27/pm-modi-meets-liechtensteins-hereditary-prince-alois-princess-sophie-at-hyderabad-house2026/
Source: Prahaar News
