Hashtagintro

Chanakya Neeti : कुटुंबप्रमुखाचा स्वभाव कसा असायला हवा, चाणक्यांनी सांगितंलय ‘हे’ गुण नसतील तर…

Chanakya Neeti : कुटुंबप्रमुखाचा स्वभाव कसा असायला हवा, चाणक्यांनी सांगितंलय ‘हे’ गुण नसतील तर…

Chanakya Neeti : प्रत्येक कुटुंबात एक कुटुंबप्रमुख असतो. त्याच्या स्वभावात असलेल्या गुणांवर सर्व कुटुंबियांची वागणूक आणि घराचं वातावरण अवलंबून असतं. अशाच आचार्य चाणक्य यांनी कुटुंबप्रमुखात कोणते चांगले गुण असायला हवेत याबद्दल सांगितलं आहे. सांगायचं झालं तर, आचार्य चाणक्य हे जगातील महान विद्वान, तत्त्वज्ञ आणि मुत्सद्दींपैकी एक आहेत. कौटिल्य आणि विष्णूगुप्त या नावांनीही ओळखल्या जाणाऱ्या त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनासाठी अत्यंत उपयुक्त अशी अनेक तत्त्वे आणि सल्ले दिले आहेत. त्यांची तत्त्वे कौटुंबिक जीवन, शिक्षण, विवाह आणि कार्य यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये उपयुक्त आहेत. कुटुंब हे या जगातील सर्वात सुंदर नातं आहे. आचार्य चाणक्यांची कौटुंबिक जीवन आणि आर्थिक बाबींवरील तत्त्वे, विचार आणि मार्गदर्शन आजही अत्यंत महत्त्वाचे आहेत.

कुटुंबात सुख आणि शांतता नांदण्यासाठी, कुटुंबातील प्रत्येक सदस्याने त्यासाठी कठोर परिश्रम करणं आवश्यक आहे. विशेषतः कुटुंबप्रमुखाने…. चाणक्य सांगतात की, कुटुंबाला आनंदाने आणि शांततेने पुढे जाण्यासाठी अनेक घटक प्रभाव टाकतात, परंतु कुटुंबप्रमुखाची चुकीची वागणूक आणि सवयी त्याच कुटुंबाच्या विनाशास कारणीभूत ठरू शकतात. आचार्य चाणक्यांनुसार, या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या कुटुंबाच्या सुख आणि प्रगतीमध्ये अडथळा आणू शकतात…

उधळपट्टी : अनावश्यक खर्च ही कोणत्याही कुटुंबाला उद्ध्वस्त करणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे. जर कुटुंबप्रमुखाला विनाकारण पैसे खर्च करण्याची किंवा उधळपट्टी करण्याची सवय असेल, तर ते कुटुंब नेहमीच आर्थिक अडचणीत राहील. अनेक कुटुंबांचा संपूर्ण भार कुटुंबप्रमुखालाच उचलावा लागतो. जर तो स्वतःच आर्थिक बाबतीत निष्काळजी असेल आणि विनाकारण पैसे खर्च करत असेल, तर संपूर्ण कुटुंब मोठ्या संकटात सापडेल.

वाईट सवयी : चाणक्य असा इशारा देतात की, जर कुटुंबप्रमुखाला वाईट सवयी असतील, तर कुटुंबाची कधीच प्रगती होत नाही. या वाईट सवयींमुळे संपत्ती आणि आरोग्य दोन्हीचे नुकसान होतं. अधिक सहजपणे पैसे कमवण्याच्या इच्छेतून केलेल्या चुका आणि मद्यपानासारख्या वाईट सवयींमुळे प्रचंड आर्थिक नुकसान होतं आणि अंतिमतः कुटुंबाचा पूर्णपणे नाश होतो.

महिलांचा अनादर : चाणक्य सांगतात, जो कुटुंबप्रमुख घरातील स्त्रियांचा आदर करत नाही, त्याला सतत समस्या आणि त्रासाला सामोरे जावं लागतं. जी घरे घरातील स्त्रियांचा अपमान किंवा अनादर करतात, ती कधीच समृद्ध होत नाहीत. चाणक्य आपल्याला आठवण करून देतात की, जिथे स्त्रियांचा आदर केला जातो, तिथे समृद्धी आणि देवी लक्ष्मीची कृपा असते.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language