Hashtagintro

Historical Heritage Nashik| ऐतिहासिक वारसा डिजिटलद्वारे जतन करा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी छायाचित्रे, ध्वनिमुद्रण, व्हिडिओ आणि अन्य दृक्श्राव्य दस्ताऐवजांचे डिजिटल स्वरूपात संवर्धन करणे आवश्यक आहे. नाशिकच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाची माहिती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठांकडून करण्यात येत आहे.

दरवर्षी २७ ऑक्टोबर रोजी जागतिक दृक्श्राव्य वारसा दिन साजरा केला जातो. युनेस्कोच्या पुढाकाराने साजरा होणाऱ्या या दिनाचा उद्देश ध्वनिमुद्रित ध्वनी, छायाचित्रे, चित्रफिती आणि अन्य दृक्श्राव्य दस्ताऐवजांचे महत्त्व अधोरेखित करणे, तसेच त्यांच्या जतनाबाबत जनजागृती करणे हा आहे.

दृक्श्राव्य दस्तावेज हे केवळ आठवणींचे साधन नसून, समाजाच्या इतिहासाचे, संस्कृतीचे आणि तंत्रज्ञानातील बदलांचे महत्वपूर्ण साक्षीदार आहेत. नाशिकमधील ऐतिहासिक वास्तू, जुनी मंदिरे, सांस्कृतिक परंपरा, व्यक्तींच्या आठवणी आणि जुन्या वस्तू यांचे छायाचित्रण आणि ध्वनिमुद्रण करून त्यांची डिजिटल नोंद ठेवता येऊ शकते.

ऐतिहासिक स्थळांना भेट देताना त्यांचे फोटो, व्हिडिओ आणि संबंधित माहिती संकलित करून समाजमाध्यमांवर शेअर केल्यास या वारशाची ओळख अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तसेच जुन्या ध्वनिमुद्रिका, ध्वनिफिती आणि चित्रफिती यांचे योग्य पद्धतीने जतन करणेही गरजेचे आहे.

ग्रामोफोन हा केवळ गाणी ऐकण्याचे साधन नसून, मानवी संस्कृती, संगीत आणि तंत्रज्ञानातील क्रांतीचा जीवंत दस्तावेज आहे. त्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि जतनमूल्य अनन्यसाधारण आहे. जुन्या वस्तूंचे संग्राहक म्हणून माझ्यासाठी ‘जे जे जुने, ते ते सोने’ ही उक्ती सार्थ ठरत आहे. ग्रामोफोन तर सोन्यापेक्षाही अधिक मौल्यवान आहे; कारण त्यात आठवणी जपल्या जात आहेत.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language