Hashtagintro

Amit Shah: 'मत चोरी'च्या आरोपांवर चर्चेसाठी तयार : अमित शहांचे राहुल गांधींना आव्हान

Amit Shah on Vote Chori

लखनऊ: “विरोधी पक्षांनी केलेल्या ‘मत चोरी’च्या आरोपांवर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यास तयार आहे. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी या चर्चेसाठी कधीही तयार होणार नाहीत,” असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.

लखनऊमध्ये शुक्रवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. शहा म्हणाले की, “मी ‘मत चोरी’च्या आरोपांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यास तयार आहे. पण राहुल गांधी कधीही याला सहमत होणार नाहीत. ते संसदेत या विषयावर चर्चा करणार नाहीत, उलट रस्त्यावर येऊन गोंधळ घालतील.”

शहा पुढे म्हणाले की, “मी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना आव्हान देतो की, त्यांनी प्रत्येक आरोपावर संसदेच्या आत चर्चा करावी. निवडणूक आयोगावर केलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत. त्यांना चर्चा नको आहे, त्यांना फक्त रस्त्यावर येऊन नाटक करायचे आहे.”

विरोधी पक्षांकडून शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सार्वजनिक महाभियोग आणण्याची तयारी सुरू असतानाच गृहमंत्री शहा यांची ही मवाळ प्रतिक्रिया समोर आली आहे. तसेच, रविवारी रामलीला मैदानावर ‘लोकशाहीचा विध्वंस’ होत असल्याचा आरोप करत विरोधकांकडून मोठे आंदोलनही करणार आहेत.

‘इंडिया’ आघाडीने शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी हा ‘सार्वजनिक महाभियोग’ आयोजित करण्याचे ठरवले होते, परंतु अवकाळी पावसामुळे तो कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर, मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेवरूनही जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोगाने सत्ताधारी भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी, पद्धतशीरपणे मतदार याद्यांमधून काही नावे वगळण्यासाठी राबवली होती, असा विरोधकांचा आरोप आहे.

भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या एक दिवसीय बैठकीत बोलताना शहा यांनी भाजपच्या कामगिरीची तुलना काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या कामगिरीशी केली. तसेच, ओडिशा आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये भाजप सत्तेत कसा आला, यावरही त्यांनी भाष्य केले. याउलट, अखिलेश यादव आणि राहुल गांधी आपल्या पक्षांना सत्तेपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरले आहेत. समाजवादी पक्षाने शेवटची विधानसभा निवडणूक पक्षाचे संस्थापक आणि अखिलेश यांचे वडील मुलायम सिंह यादव हयात होते तेवा जिंकली होती. तुम्ही स्वतःच्या बळावर एकही निवडणूक जिंकलेली नाही. राहुल गांधींच्या बाबतीतही तसेच आहे,” असे शहा म्हणाले.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language