
Gold Purity Test : दरवर्षी धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सराफा बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. या दिवशी अनेकजण सोन्याची, सोन्याच्या दागिण्यांची खरेदी करतात. तुम्हीही सोन्याची खरेदी करणार असाल तर तुमची फसवणूक तर होणार नाही ना, याची काळजी घेतली पाहिजे. आपण खरेदी केलेलं सोन हे शुद्ध आहे, आपली फसवणूक तर झालेली नाही ना? हे ओळखण्याच्या एकूण पाच महत्त्वाच्या ट्रिक आहेत. या ट्रिक कोणत्या ते जाणून घेऊ या…
BIS हॉलमार्क जरूर चेक करा
सोन्याची शुद्धता तपासायची असेल त BIS हॉलमार्क जरूर तपासावे. हॉलमार्क असलेल्या दागिन्यावर BIS चा लोगो, सोन्याच्या शुद्धतेचे निशाण, तसेच सहा अंकाचा HUID असतो. शुद्धतेच्या निशाण पाहून तुमचे सोने किती शुद्ध आहे हे समजू येते. 22 कॅरेट सोन्यावर 22K किंवा 916 असे लिहलेले असते. 18 कॅरेट सोन्यावर 18K किंवा 750 आणि 14 कॅरेट सोन्याच्या दगिन्यावर 14K किंवा 585 असे लिहिलेले असते.
सिरॅमिकवर सोने घासा
तुम्ही घरबसल्याही सोन्याची शुद्धता तपासू शकता. यासाठी सिरॅमिक उपयोगी पडू शकते. तुम्ही खरेदी केलेले सोने सिरॅमिकवर रगडल्यास ते शुद्ध आहे की नाही हे समजून येते. सिरॅमिकवर सोने घाकल्यास सोनेरी रंगाची रेष येत असेल तर ते सोने शुद्ध आहे, असे समजावे. तर हिरव्या किंवा अन्य रंगाच्या रेषा येत असतील तर सोन्यात भेसळ आहे असे समजावे.
व्हिनेगरच्या मदतीनेही शुद्धता तपासा
व्हिनेगरच्या मदतीनेही तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासता येते. शुद्ध सोन्याच्या दागिन्यावर व्हिनेगरचे काही थेंब टाकल्यास रंगात बदल होत नाही. परंतु सोन्यता भेसळ असेल तर दागिन्याचा रंग बदलतो.
सोन्याचा रंग बदलला की…
तुम्ही सोन्याचे दागिने घातल्यानंतर तुमच्या त्वचेचा रंग हिरवा किंवा अन्य रंगाचा होत असेल तर सोन्यात भेसळ आहे, असे समजावे. दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्याच्या या घरच्या काही पद्धती असल्या तरीही तुमचे सोने किती शुद्ध आहे याचा शोध अधिकृत टेस्टिंग सेटरवर जाऊनच घ्यावा. सोने खरेदी करताना BIS हॉलमार्क, एचयूआईडी नंबर आणि पक्का बिल जरूर चेक करा. यामुळे तुमची फसवणूक होणार नाही.
Source: TV9 Marathi Business
