मुलगी जन्माला आली की आई – वडिलांच्या मनात तिच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या अनेक गो्ष्टिंचे नियोजन सुरू होतं. तिचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावं, यासाठी अनेक पालक आधीपासूनच बचत करण्याचा विचार करतात.
अशाच पालकांसाठी केंद्र सरकाराची सुकन्या समृद्धी योजना उपयोगी ठरू शकते. या योजनेत अगदी 250 रूपयांपासून खात सुरू करता येतं. विशेष म्हणजे, सध्या या योजनेवर 8.2% वार्षिक व्याज दिलं जात आहे.
कोण उघडू शकतं हे खातं : सुकन्या समृद्धी योजनेत मुलगी 10 वर्षांची होण्यापूर्वी तिच्या नावाने खाते उघडता येते. हे खाते मुलीचे आई – वडील उघडू शकतात. एका मुलीच्या नावाने खाते उघडता येते. त्यानंतर दोन मुलींसाठीही खाते उघडता येते, मात्र तिळ्या किंवा जुळ्या मुलींसाठी अतिरिक्त नियम आहेत.
किती पैसे जमा करता येतात : या खात्यात सुरूवातीला किमान 250 रूपये जमा करावे लागतात. त्यानंतर एका आर्थिक वर्षात 250 रूपये जमा करणं आवश्यक आहे. एका वर्षांत जास्तीत जास्त दीड लाख रूपये जमा करता येतात. दर महिन्याला पैसे भरणं गरजेचे नाही. आपल्या सोयीनुसार पैसे जमा करता येतात. 21 वर्षांनी खाते उघडून त्याचा लाभ घेता येतो.
सध्या किती व्याज मिळतं :ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या तीन महिन्यांसाठी सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2 % वार्षिक ठेवण्यात आला आहे. या योजनेतील व्याजाची गणना नियमानुसार केली जाते आणि ते दरवर्षी खात्यात जमा होतं. मात्र हा व्याजदर कायम एकसारखा राहिल असं नाही. केंद्र सराकारकडून दर तीन महिन्यांसाठी लहान बचत योजनांचे व्याजदर निश्चित केले जातात.
खाते उघडण्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात? : खाते उघडण्यासाठी मुलीचा जन्म दाखला, सुकन्या समृद्धी खाते उघडण्याचा अर्ज आणि पालकांचे आधार कार्ड व पॅन कार्ड किंवा नियमांनुसार फॉर्म 60 आवश्यक असतो. खाते पोस्ट ऑफिस किंवा या योजनेसाठी अधिकृत असलेल्या बँकेत उघडता येतं.
पैसे कधी काढता येतात ? : मुलीच्या उच्च शिक्षणासाठी खात्यातील रकमेच्या 50 टक्क्यापर्यंत पैसे काढण्याची सुविधा आहे. यासाठी योजनेतील वय आणि आवश्यक कागदपत्रांचे नियम पुर्ण करावे लागतात. मुलीच्या लग्नासाठीही नियमानुसार खाते बंद करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
Source: TV9 Marathi Business







