Hashtagintro

Mahesh Manjrekar : मी कॅन्सर पेशंट, खूप निराश झालोय…महेश मांजरेकर यांनी मागितली माफी; काय घडलं?

Mahesh Manjrekar : मी कॅन्सर पेशंट, खूप निराश झालोय…महेश मांजरेकर यांनी मागितली माफी; काय घडलं?

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यांच्या ‘शंकर-जयकिशन’ या नाटकाचे अमेरिकेतील नियोजित प्रयोग प्रकृतीच्या कारणामुळे रद्द करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे अमेरिकेतील मराठी नाट्यरसिकांची निराशा झाली आहे. नाटकाचे प्रयोग पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांची गैरसोय झाल्याने संबंधित कलाकारांनी त्यांची माफी मागितली आहे. या नाटकाची निर्मिती भरत जाधव एंटरटेनमेंटने केली असून सुरज पारसनीस यांनी दिग्दर्शन केलं आहे. विराजस कुलकर्णी लिखित या नाटकात भरत जाधव, महेश मांजरेकर आणि शिवानी रांगोळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तब्बल २९ वर्षांनंतर महेश मांजरेकर यांनी या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर पुनरागमन केलं होतं.

महेश मांजरेकर यांनी मागितली माफी

याबद्दल महेश मांजरेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. महेश मांजरेकर म्हणाले की, ‘अमेरिकेतले नाट्यप्रेमी आणि सगळे आमचे तिकडचे मित्र, आम्ही ‘शंकर जयकिशन’ हे नाटक घेऊन येणार होतो. पण, व्हिसाची अपॉइंटमेंट न मिळाल्यामुळे ते शोज कॅन्सल करावे लागले. परत त्यांनी व्हिसाची अपॉइंटमेंट दिली 15 तारखेला आणि मी 21 आणि 22 तारखेला डेट्रॉइटला एक शो आणि न्यू जर्सीला दोन शोज असं करायचं ठरलं.’

 

 

‘सगळ्यांनाच माहितीये मी कॅन्सर पेशंट आहे, मला ब्लॅडर नाहीये, माझं निओ-ब्लॅडर आहे. फार मोठा प्रवास, म्हणजे सलग दिवसात करणं मला शक्य होत नाही. निओ-ब्लॅडरवर प्रेशर येतं. त्यामुळे डॉक्टर्सचं ॲडव्हाइस आहे की, इतक्या शॉर्ट नोटीसमध्ये म्हणजे चार-पाच दिवसांत जाऊन अमेरिकेला येणं माझ्या तब्बेतीसाठी बरं नाही. मी खूप खूप निराश झालो आहे. मला खरंच खूप मनापासून इच्छा होती की, तिकडे येऊन परफॉर्म करायचं तुमच्यासाठी पण मला त्यांच्यासाठी खूप वाईट वाटतंय. त्याला पण खूप नुकसान झालं असणार, एवढे शोज त्याचे कॅन्सल झाले. आणि तो बिचारा विचार करत होता की, तीन शोज तरी करू, पण फक्त माझ्या मेडिकल कंडिशनमुळे ते शक्य होणार नाहीये. पण कधीतरी पुढे जेव्हा असे खूप शोज असतील, तेव्हा मला तो प्रवासाचा त्रास होणार नाही, तेव्हा नक्कीच मला ‘शंकर जयकिशन’ करायला आवडेल. पण यावेळी मला समजून घ्या, मीही खूप निराश झालो आहे आणि मला माहितीये तुम्ही पण खूप निराश झाला असाल. पण काही गोष्टी माझ्या नियंत्रणाबाहेर आहेत.’ असं महेश मांजरेकर शेवटी म्हटलं आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language