मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर नव्याने उभारण्यात येणाऱ्या टाऊन हॉल जिमखान्याचे बांधकामासह महापालिका सभागृह उभारण्याचा करण्यात येणार आहे. मात्र, हा प्रस्ताव प्रशासकीय कारणांमुळे हा प्रस्ताव प्रशासनानेच मागे घेतला. त्यामुळे आता तांत्रिक बाजू सुधारीत करून नव्याने हा प्रस्ताव सादर करण्यात येणार असून तुर्तास नवीन प्रस्ताव पटलावर येणार आहे. त्यामुळे नवीन सभागृहाच्या बांधकामाचा प्रस्तावाची मंजुरी आता लांबणीवर पडलेली आहे.
महापालिका मार्ग, मुंबई येथील फोर्ट विभागातील सी.एस. नं. १४४४ आणि भाग क्र. ४/७२९ या भूखंडावर महानगरपालिका टाऊनहॉल जिमखान्याचा विकास करण्यासाठी यापूर्वी एप्रिल २०२६मध्ये प्रस्ताव सादर झाला होता. परंतु, सध्याच्या महापालिका सभागृहाची जागा अपुरी पडत असल्याने टाऊन हॉलच्या जिमखान्यांच्या वास्तूत सभागृह उभारण्याची मागणी सभागृहनेत्यांनी स्थायी समितीत करून हा प्रस्ताव परत पाठवून सभागृहासह नवीन आराखडा बनवून सुधारीत आरखड्यासह सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सुधारीत आराखड्यानुसार महापालिकेने पुन्हा निविदा मागवून हा प्रस्ताव सादर केला आहे.
https://www.prahaar.in/2026/11/05/the-path-is-now-clear-for-asiatic-lions-to-arrive-at-the-rani-baug-mumbai-zoo-gujarat-chief-minister-bhupendrabhai-patel-has-directed-that-a-memorandum-of-understanding-mou-be-signed-between-the/
या संकल्पनात्मक सुधारित आरखड्यामध्ये सांस्कृतिक दालन, वाहनतळ, बॅडमिंटन कोर्ट, व्यायामशाळा, इनडोर खेळाकरिता जागा महापौर दालन व कार्यालय, उपमहापौर दालन व कार्यालय, महापालिका विरोधी पक्ष नेता दालन व कार्यालय तसेच प्रशस्त ३२० नगरसेवक बसण्या करिता सभागृह, पत्रकार कक्ष आदींचा समावेश केला आहे. या बांधकामांमध्ये तळघर १ अधिक तळघर २ अधिक तळमजला आणि वरचे ४ मजले, ५ व्या मजल्याचा अंशतः भाग आणि व्युइंग गॅलरी, टेरेस मजल्यावरील काचेचा घुमट, कार लिफ्ट, कॅप्सूल लिफ्ट, स्टॅक पार्किंग इत्यादींचा समावेश आहे. त्यामुळे हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी आला असता मान्यतेबाबत अधिनियमातील कलम चुकीचे असल्याने प्रशासकीय बाबींमुळे सुधारीत प्रस्ताव सादर करण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव मागे घेतला. यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेता आलेला नाही.
Source: Prahaar News
