Hashtagintro

Celebrate Diwali with farmers: शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्र्यांना आवाहन

नागपूर : राज्यात एकीकडे दिवाळीचे वातावरण तर दुसरीकडे शेतकरी बांधवांची दुष्काळी परिस्थिती,अशा वेळी त्यांना आधार देणे आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण आहे. मात्र, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सध्याची परिस्थिती आव्हानात्मक आहे. त्यामुळे सणाच्या आनंदात शेतकरी कुटुंबांचाही सहभाग असावा आणि आपण एकटे नसल्याची जाणीव व्हावी, या भावनेतून प्रत्येक मंत्र्यांनी दिवाळीतील एक दिवस एखाद्या गावात जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून, विविध सामाजिक संस्था, संघटना राजकीय नेते तसेच नागरिकही मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. या सर्व प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरूप देत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मदत कशी पोहोचविता येईल, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शासकीय निवासस्थानी रामगिरी येथे पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार संजय भेंडे, परिणय फुके, आमदार कृष्णा खोपडे उपस्थित होते.
राज्याच्या अर्थव्यवस्थेचा शेतकरी हा महत्वाचा आधारस्तंभ आहे. शेतीशी संबंधित अडचणींचा परिणाम हा केवळ शेतकरी बांधवांच्या कुटुंबापुरता मर्यादित न राहता ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना संकटाच्या काळात मदत करणे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
https://www.prahaar.in/2026/11/05/tmc-news-facility-for-pensioners-to-obtain-a-digital-life-certificate-from-the-comfort-of-their-homes-launch-of-the-tmc-life-certificate-digital-system-app/
शेतकऱ्यांच्या अडचणी, त्यांना आवश्यक असलेले सहकार्य आणि मदत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याच्या दृष्टीने सर्व मंत्र्यांसोबत विचारविनिमय करण्यात आले. केवळ शासकीय पातळीवरच नव्हे, तर सामाजिक स्तरावरही शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध संस्था आणि व्यक्तींकडून सुरू असलेल्या मदतकार्याला प्रोत्साहन देण्याची भूमिका शासनाने घेतली असल्याचे ते फडणवीस यांनी सांगितले.
ग्रामीण भागात जाऊन शेतकरी कुटुंबांशी मंत्र्यांनी संवाद साधावा, त्यांच्या परिस्थितीची माहिती घ्यावी आणि त्यांच्या अडचणी समजून घ्या, असा व्यापक सामाजिक संदेश अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांना मानसिक आधार देणे आणि त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणे, या दृष्टीने हा उपक्रम महत्वाचा ठरू शकतो, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. याच भावनेतून मंत्र्यांनी दिवाळीचा एक दिवस शेतकऱ्यांसोबत घालवावा. मीही नागपूर जिल्ह्यातील एका गावात एक दिवस जाणार आहे. दुष्काळावर सर्व मिळून मात करूया असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language