Hashtagintro

Satara Sugarcane Price | सांगलीतील दरानंतरच साताऱ्यात ऊस दराचा अंतिम निर्णय : ना. शंभूराज देसाई

सातारा : सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अंतिम ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी शनिवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्‍हा बँकेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सातारा जिल्ह्यातील ऊस दर निश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

सातारा आणि सांगली जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांचे कार्यक्षेत्र एकमेकांशी संलग्न असल्याने सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी अंतिम ऊस दर जाहीर केल्यानंतरच सातारा जिल्ह्यातील कारखान्यांच्या संचालक मंडळाच्या बैठका घेऊन अंतिम दर जाहीर करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सांगलीतील कारखान्यांच्या ऊस दर घोषणेकडे आता सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला योग्य आणि समाधानकारक दर मिळावा, यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींसोबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, खा. नितीन पाटील, आ. डॉ. अतुल भोसले, जिल्‍हाधिकारी संतोष पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्‍याचे अध्‍यक्ष यशराज देसाई, जिल्‍हा बँकेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्यासह जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांचे चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक तसेच बँकेचे संचालक उपस्थित होते. जिल्ह्यातील ऊस दर निश्चित करताना रिकव्हरीचा निकष महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात रिकव्हरीचे दोन झोन निश्चित करावेत, अशी सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बैठकीत केली.

कोल्हापूर फॉर्म्युल्याबाबत राजू शेट्टींशी चर्चा करणार

कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची सरासरी रिकव्हरी सुमारे १३ टक्के, तर सातारा जिल्ह्यातील कारखान्यांची सरासरी रिकव्हरी ११.३ टक्क्यांच्या आसपास आहे. दोन्ही जिल्ह्यांच्या रिकव्हरीमध्ये सुमारे दीड टक्क्याचा फरक असल्याने ऊस दर निश्चित करताना कोल्हापूर फॉर्म्युल्याचा अभ्यास करावा लागेल. यासंदर्भात प्रशासन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी निश्चितपणे चर्चा केली जाईल. त्यानंतर पुढील अंमलबजावणीबाबत निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language