Hashtagintro

Mandap Decoration Godown Fire | फुलेवाडीत मंडप डेकोरेशन साहित्य गोडावूनला आग

फुलेवाडी : फुलेवाडी रिंग रोड येथील नृसिंह कॉलनी परिसरातील मंडप डेकोरेशन साहित्याच्या गोडावूनला हवेत उडणाऱ्या फटाकडीमुळे आग लागून सुमारे २० लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. आगीचे लोट मोठ्या प्रमाणात उडाल्यामुळे शेजारील घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

नृसिंह कॉलनी परिसरात मोरे-माने नगर येथे राहणारे उमेश अनिल मोरे यांचे डेकोरेशन साहित्याचे गोडावून आहे. भाड्याने घेतलेल्या जागेत ते जवळपास दोन वर्षांपासून आपला व्यवसाय करीत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी फायबर व इतर मंडप डेकोरेशनचे नवीन साहित्य विकत घेतले होते. रविवारी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हवेतील एक फटाका उडून गोडावूनमध्ये पडल्यामुळे साहित्याने पेट घेतला. गोडाऊनमध्ये असणारे फायबरचे मोल्ड, कनात, डेकोरेशनचे कपडे या साहित्याने पेट घेतला. गोडावूनच्या समोरील रोहित पोतदार यांच्या आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित अग्निशमन विभागाला फोन केला; मात्र दहा मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले होते.

आगीचे लोट तीस ते पस्तीस फूट हवेत उडत असल्यामुळे घराच्या समोरील सर्व पत्रे, विद्युत पोलवरील सर्व वायरिंग वितळून गेले होते. गोडावूनच्या मागील बाजूस राहणारे शंकर दाभाडे यांच्या घरातील खिडक्या जळून खाक झाल्या. तसेच घरातील सर्व पाण्याच्या टाक्या तसेच प्लंबिंगचे साहित्य मोठ्या प्रमाणात जळाल्यामुळे त्यांचे नुकसान झाले. महावितरणचे कर्मचारी जानू येडगे हे रस्त्यावरून जात असताना त्यांच्या निदर्शनास आग लागल्याचे दिसल्यानंतर त्यांनी त्वरित परिसरातील विद्युत पुरवठा खंडित केला. परिसरातील शिवाजी बोडके यांनी आग लागल्यानंतर गोडावूनमध्ये असणारी चारचाकी वाहन व सिलिंडर बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language