Hashtagintro

कंपनीच्या प्रेमात पडू नका, त्याऐवजी तुम्ही.. नारायण मूर्तींचा नोकरदारांना खास सल्ला

कंपनीच्या प्रेमात पडू नका, त्याऐवजी तुम्ही.. नारायण मूर्तींचा नोकरदारांना खास सल्ला

आजच्या काळात नोकरी मिळवणं आणि ती टिकवणं हे अनेकांसाठी मोठं आव्हान असतं. त्यामळे काही कर्मचारी आपल्या कंपनीसाठी गरजेपेक्षा जास्त वेळ देतात. ऑफिसचं काम पूर्ण करण्यासाठी स्वत: चा वेळ,कुटुंब आणि आरोग्य याकडेही दुर्लक्ष करतात.आपण ज्या कंपनीत काम करतो. तिच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणं नक्कीच महत्त्वाचं आहे. मात्र कंपनीलाच आपली संपूर्ण ओळखं बनवणं योग्य आहे का? आपल्या कामावर प्रेम करा,पण कंपनीच्या प्रेमात पडू नका असे इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी केला आहे.

इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना हा संदेश इन्फोसिसमधील एका ‘मेंटॉर सेशन’ (Mentor Session) दरम्यान कर्मचाऱ्यांना आणि तरुणांना दिला. त्यांच्या म्हणण्यांनुसार आपण जे काम करतो, त्यात मनापासून रस असण गरजेचं आहे. केवळ महिन्याच्या पगारासाठी काम करण्याऐवजी त्यातून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्यावर काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्यावर सोपवलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पूर्ण करणं. स्वत: च्या कौशल्यांमध्ये सुधारणा करणं आणि कामाचा दर्जा वाढवणं याकडे लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती कामाचा आनंद घेते, तेव्हा तिला प्रत्येक वेळी वरिष्ठांच्या कौतुकाची किंवा इतरांच्या शाबासकीची अपेक्षा ठेवावी लागत नाही.

कंपनीशी जास्त आसक्ती असणे का चांगले नसते?

नारायण मूर्ती पुढे म्हणाले की, आपल्या कंपनीच्या इतके प्रेमात पडू नका की तुमची संपूर्ण ओळख तिच्याशी जोडली जाईल. वास्तविक पाहता, कंपनी हे कुटुंब नसून एक व्यवसाय आहे. काळानुसार माणसे बदलतात, बॉस बदलतात, धोरणे बदलतात आणि कधीकधी कंपनीची काम करण्याची पद्धतसुद्धा बदलते.

तुम्ही आज ज्या कंपनीत काम करता, तिथे काही वर्षांत तुमच्यासाठी जागा नसेलही. कधीकधी कंपनी एखाद्याला कामावरून काढून टाकू शकते, किंवा कधीकधी तुम्ही अधिक चांगल्या संधीसाठी नोकरी सोडू शकता. जर तुम्ही स्वतःला केवळ त्याच कंपनीशी जोडले असेल, तर त्यातून बाहेर पडणे खूप कठीण होऊन जाते

अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच कंपनीत काम करत असतात. त्यामुळे तिथल्या सहकाऱ्यांशी आणि वातावरणाशी त्यांचं भावनिक नातं तयार होतं. कधी कामाचा ताण वाढला, सतत जास्त वेळ काम करावं लागलं किंवा प्रगतीच्या संधी मिळेनाशा झाल्या, तरी काही जण नोकरी सोडण्याचा विचार करत नाहीत.

तुमची खरी ताकद कंपनी नाही, तर तुमचं कौशल्य!

आपण कोणत्या कंपनीत काम करतो. यापेक्षा आपण काय शिकतो आणि किती चांगलं काम करू शकतो. हे अधिक महत्त्वाचं आहे. कंपनी बदलली तरी आपलं कौशल्य, अनुभव आणि काम करण्याची क्षमता आपल्यासोबतच राहते. त्यामुळे नवीन गोष्टी शिकतं राहणं, स्वत:ला अपडेट ठेवणं आणि भविष्यातील संधीसाठी तयार राहणं गरजेचं आहे.

  1. आपल्यावर सोपवलेलं काम प्रामाणिकपणे आणि चांगल्या दर्जाचं करण्याचं प्रयत्न करा.
  2. स्वत: ची ओळख केवळ कंपनीपुरती मर्यादित ठेवू नका.
  3. नवीन कौशल्य शिका आणि स्वत: च्या क्षमतांमध्ये सातत्याने सुधारणा करा.
  4. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात समतोल ठेवा.
  5. सध्याच्या नोकरीत प्रगतीची संधी नसेल, इतर पर्यायांचा विचार करण्यास घाबरू नका.

Source: TV9 Marathi Business

Read full article on TV9 Marathi Business

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language