Hashtagintro

मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि पोलीस सहआयुक्त दीपक साकोरे यांची 'पंचदीप बालगृहात' दिवाळी; कायद्याचे शिक्षण पूर्ण केलेल्या वैजयंती कदमचा विशेष सत्कार!

मुंबई: महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि त्यांचे पती, नवी मुंबई शहर पोलीस सहआयुक्त दीपक साकोरे यांनी पनवेलमधील खांदा कॉलनी येथील ‘पंचदीप बालग्राम संकुल’ येथे सदिच्छा भेट देत बालकांसोबत दिवाळी साजरी केली. या भेटीदरम्यान त्यांनी बालगृहातील मुलांसोबत अत्यंत आनंदी आणि आपुलकीच्या वातावरणात मनमोकळा संवाद साधला.

मुलांच्या आरोग्याची व शिक्षणाची केली चौकशी
या विशेष भेटी दरम्यान राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मुलांच्या शिक्षणाची, आरोग्याची तसेच त्यांना बालगृहात पुरवण्यात येत असलेल्या विविध सोयी-सुविधांची अत्यंत आस्थापूर्वक चौकशी केली. यावर मुलांनीही न जुमानता राज्यमंत्र्यांशी संवाद साधत आपल्या दैनंदिन दिनचर्येची व अभ्यासाची माहिती दिली. सर्व मुलांनी उत्तम शिक्षण घेऊन जीवनात यश संपादन करावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा राज्यमंत्र्यांनी यावेळी मुलांना दिल्यात.
https://www.prahaar.in/2026/11/12/devendra-fadnavis-develop-crops-that-yield-higher-produce-with-less-water-an-appeal-by-devendra-fadnavis/
वैजयंती कदम हिचा गौरव ठरला मुख्य आकर्षण
या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे, पूर्वी याच बालगृहात राहिलेली आणि जिद्दीच्या बळावर कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणारी विद्यार्थिनी वैजयंती कदम हिचा सत्कार सोहळा ठरला. राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन वैजयंतीचा गौरव करण्यात आला, जो बालगृहातील इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरला.
या प्रेरणादायी व सलोख्याच्या कार्यक्रमास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे, सहाय्यक पोलीस आयुक्त भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे, पंचदीप बालग्रामच्या कार्याध्यक्ष मीनल टिपणीस, ‘वन स्टॉप सेंटर’च्या सरिता वाडेकर आणि ‘1098 चाइल्ड हेल्पलाइन’च्या नीलाक्षी दगडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने बालगृहातील मुले उपस्थित होती.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language