Hashtagintro

Satara Crime| बांधकाम मजूर महिलेचा इमारतीवरून पडून मृत्यू

कराड : उदरनिर्वाहासाठी पतीसोबत बांधकामावर मजुरी करणाऱ्या ३२ वर्षीय महिलेचा इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मलकापूर येथील आगाशिवनगरमधील माळीनगर परिसरात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. पाचव्या मजल्यावर काम सुरू असताना ही दुर्घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

प्रिया ओंकार पटेल (वय ३२, रा. आगाशिवनगर, मलकापूर, मूळ रा. छत्तीसगड) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांचे पती ओंकार राधेलाल पटेल (वय ३६) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार पटेल हे कराडमधील एका बांधकाम ठेकेदाराकडे गवंडी काम करतात. त्यांची पत्नी प्रिया यादेखील त्यांच्यासोबत बांधकामावर मजुरीचे काम करीत होती. सध्या माळीनगर परिसरातील एका इमारतीचे बांधकाम सुरू असून, गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास ओंकार, प्रिया आणि नंदा यादव हे तिघे पाचव्या मजल्यावर काम करीत होते.

यावेळी प्रिया विटा आणण्यासाठी गेली होती. बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने ओंकार यांनी तिचा शोध सुरू केला. परिसरात शोध घेऊनही ती आढळली नाही. अखेर ते इमारतीच्या खाली आले असता जिन्याजवळ प्रिया जमिनीवर पडलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी तातडीने तिला सरळ केले असता तिच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येत असल्याचे निदर्शनास आले.

सहकाऱ्यांच्या मदतीने तिला तातडीने कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे पटेल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रिया इमारतीवरून नेमकी कशामुळे पडली, याचा तपास कराड शहर पोलीस करीत आहेत.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language