Hashtagintro

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांची महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी पुण्यातील जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये शाह यांची भेट घेतली. या चारही नेत्यांमध्ये सुमारे 40 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. आगामी काळात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
सोमवारी सकाळपासूनच शाह यांच्या भेटीसाठी भाजप आणि महायुतीतील नेत्यांची हॉटेलमध्ये रीघ लागली होती. मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत शाह यांची स्वतंत्र बैठक झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. या बैठकांमध्ये राज्यातील राजकीय घडामोडी, शेतकऱ्यांना द्यावयाची मदत आणि आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार या विषयांवर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते. (Amit Shah Mahayuti Meeting)
https://www.prahaar.in/2026/11/16/amruta-khanvilkar-amruta-khanvilkar-takes-a-written-exam-for-kathak-prajakta-malis-witty-comment-grabs-attention/
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला दोन मंत्रिपदे मिळावीत, अशी मागणी पक्षाकडून करण्यात येत असल्याची माहिती आहे. यामध्ये एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपदाचा समावेश असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यात केंद्रीय मंत्रिपदाबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही शाह यांची भेट घेतली. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्रिपदाच्या मागणीसंदर्भात या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. (Maharashtra Union Cabinet Ministers)

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language