Hashtagintro

Sharad Kapoor: ‘जोश’ फेम अभिनेत्याची अशी अवस्था पाहून चाहत्यांना बसला धक्का; कामासाठी मागितली मदत

Sharad Kapoor: ‘जोश’ फेम अभिनेत्याची अशी अवस्था पाहून चाहत्यांना बसला धक्का; कामासाठी मागितली मदत

Sharad Kapoor: बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. मात्र काळानुसार काही कलाकार मनोरंजनविश्वापासून दूर जातात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता शरद कपूर. शाहरुख खानच्या ‘जोश’ चित्रपटातून लोकप्रिय झालेला हा अभिनेता सध्या कामाच्या शोधात आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद कपूरचा एक भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता त्याने स्वतः समोर येत बॉलिवूडमधील निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांकडे काम देण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे, त्याने आर्थिक मदत नव्हे, तर केवळ कामाची संधी मागितली आहे.

अभिनेत्री जया भट्टाचार्य यांनी सोशल मीडियावर शरद कपूरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजन क्षेत्रातील लोकांना शरद यांना काम देण्याचा विचार करण्याची विनंती केली. नवीन चित्रपट किंवा मालिकांवर काम करणाऱ्या निर्मात्यांनी शरद यांच्या अभिनय कौशल्याचा विचार करावा, असं आवाहन त्यांनी केलं. या व्हिडीओमध्ये शरद कपूर म्हणतो, “मी सध्या चांगल्या कामाच्या शोधात आहे. मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. मी एक उत्तम अभिनेता आहे, हे तुम्हाला माहीत आहे. मला पैशांची अडचण नाही, तर पुन्हा काम सुरू करण्याची इच्छा आहे. कदाचित जानेवारीपासून मी पुन्हा कामाला सुरुवात करू शकेन.”

पहा व्हिडीओ-

शरद कपूरने त्याच्या प्रकृतीविषयीही माहिती दिली. बार्सिलोनामध्ये फुटबॉल खेळताना त्याच्या पायाला दुखापत झाली होती. याबद्दल बोलताना त्याने मिश्किल अंदाजात सांगितलं, “फुटबॉल खेळताना मी स्वतःला लिओनेल मेस्सी समजू लागलो होतो. मात्र, एका खेळाडूचा पाय लागल्यानंतर मला गंभीर दुखापत झाल्याचं लक्षात आलं. मी जास्तीत जास्त दोन महिन्यांत पूर्णपणे बरा होऊ शकतो, असं डॉक्टर म्हणाले आहेत.”

शरद कपूरला केवळ चित्रपटांमध्येच नव्हे, तर वेब सीरिज आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरही काम करण्याची इच्छा आहे. नेटफ्लिक्स आणि जिओसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे कलाकारांना जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते, असं त्याचं मत आहे. अशी संधी मिळाल्यास आनंदाने काम करेन, असंही त्याने सांगितलं. शरद कपूरने आपल्या अभिनय कारकिर्दीत ‘जोश’, ‘लक्ष्य’, ‘जय हो’, ‘जानी दुश्मन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘जोश’ चित्रपटात त्याने शाहरुख खानसोबत काम केलं होतं. त्याच्या भूमिकेची विशेष चर्चा झाली होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तो मोठ्या पडद्यापासून दूर आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language