
Sachin Pilganokar And Supriya Pilganokar News: मराठी सिनेसृष्टीत सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर हे दोघेही गेली बरीच वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी अनेक उत्तमोत्तम कलाकृती सिने इंडस्ट्री दिल्या आहेत. सचिन आणि सुप्रिया यांना श्रिया पिळगावकर ही मुलगी आहे हे सर्वांना माहित आहे. मात्र त्यांना आणखी एक दत्तक मुलगी होती जी नंतर गायब झाली. सचिन आणि सुप्रिया या दोघांनीही त्या दत्तक मुलीला खूप लळा लावलेला पण नंतर एकाएकी तिनेच त्या दोघांना धोका दिला.
१९८८ मध्ये सचिन आणि सुप्रिया यांनी करिष्मा मखानी या लहान मुलीला दत्तक घेतलेले. तिचे वडील लंडनमधील एका रेस्टॉरंटचे मालक होते, तर तिची आई सतत आजारी असायची. करिष्मा एकटीच असायची यामुळे तिच्या वडिलांचा तिला होस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र ही गोष्ट सचिन आणि सुप्रिया यांना पटली नव्हती. ते त्यांचे खास मित्र असल्याने त्यांनी या गोष्टीचा विरोध केला. अवघ्या तीन वर्षाच्या करिष्मा ते भारतात घेऊन आले. पण इतकं करुनही त्यांनी सचिन- सुप्रियाला मोठा धोका दिला.
एके दिवशी अचानक तिला तिचे खरे वडिल लंडनला घेऊन गेले . याबद्दल त्यांनी सचिनला कोणतीच कल्पनाही दिलीही नव्हती. करिश्माच्या वडिलांनीच तिला किडनॅप केले आहे असाही आरोप सचिन यांनी एका वर्तमानपत्राला मुलाखतीत केलेला. पुढे एका मुलाखतीत करिष्माने सांगितले की, ” मी स्वतः तिच्या वडिलांसोबत लंडनला गेलेली. यानंतर १२ वर्षांनी जेव्हा तिला सिनेसृष्टीत करिअर करायचं मन झालं तेव्हा ती पुन्हा सचिन आणि सुप्रिया यांच्याकडे परतली. सहा महिने त्यांच्यासोबत राहीली पण बॉलीवूडमध्ये तिचा काही थामपत्ता लागला नाही म्हणून ती पुन्हा गेली.
करिश्माने या आरोपांबाबत एक मुलाखतही दिली होती. त्यात ती म्हणाली होती की, “मला माझ्या वडिलांनी किडनॅप केलं नव्हतं तर सचिन- सुप्रिया यांनीच माझ्या वडिलांना मला परत लंडनला घेऊन जा असं सांगितलेले. १२ वर्षांनी मला सिनेमात करिअर करायचं म्हणून मी पुन्हा भारतात परतले आणि त्यांच्यासोबत ६ महिने राहिलेली. पण तेव्हाही त्यांनी मला पूर्णपणे स्विकारले असं वाटले नव्हते. मग त्यांनीच मला घर सोडून जाण्यास सांगितले या सर्व प्रकाराचा मला खूप त्रास झाला होता. “
Source: TV9 Marathi Entertainment
