Hashtagintro

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचे नको ते फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचे नको ते फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरण चांगलेच चर्चेत होते. आता हे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल प्रकरणात दिल्लीतील आर्यन दीपक जैन याला वांद्रा पोलिसांनी अटक करून मुंबईतील कोर्टात हजर केले होते. मात्र, कोर्टाने अटकेच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आरोपीला दिलासा दिला आहे.

पोलिसांनी आरोपीला दिल्लीहून अटक करून थेट मुंबईत आणले. दिल्लीतील स्थानिक मॅजिस्ट्रेट कोर्टात ट्रान्झिट रिमांडसाठी हजर न करता त्याला मुंबईत आणल्याने कोर्टाने ही प्रक्रिया बेकायदेशीर ठरवली. आरोपीच्या अटकेपूर्वी नोटीस न देणे तसेच अटकेची कारणे नोंदवण्याच्या बीएनएसएस कलम ३५ मधील तरतुदींचे पालन न झाल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. पोलिसांनी आरोपीच्या तीन दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मॉर्फ फोटो तयार करण्यासाठी वापरलेले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस शोधायचे असल्याचे कारण त्यांनी दिले होते. मात्र, कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्याचे पोलिसांना निर्देश देत कोर्टाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळली आणि आरोपीला जामीन मंजूर केला.

या प्रकरणात सोनाक्षी सिन्हाच्या मॉर्फ केलेल्या अश्लील छायाचित्रांचा आणि व्हिडिओंचा अल्बम सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे अभिनेत्रीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला असल्याचे सांगितले जात आहे. वांद्रे पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता आणि मुख्य आरोपी म्हणून आर्यन दीपक जैन याला अटक केली होती. कोर्टाच्या निर्णयामुळे अटकेच्या कायदेशीर प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही अटकेपूर्वी कायद्यातील तरतुदींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा अटक बेकायदेशीर ठरू शकते आणि आरोपीला दिलासा मिळू शकतो.

सध्या आरोपी जामिनावर मुक्त झाला असला तरी प्रकरणाचा तपास सुरूच आहे. पोलिसांनी आता कायदेशीर चौकटीत राहून पुढील कारवाई करावी लागणार आहे. सोनाक्षी सिन्हा प्रकरणाने डिजिटल माध्यमांतील अश्लील सामग्री आणि मॉर्फिंगच्या वाढत्या घटनांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language