Hashtagintro

PM Narendra Modi : बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आदिवासी विकासाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन

गडचिरोली :  आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त रविवारी देशभरात जनजातीय गौरव दिवस साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता महाराष्ट्रातील गडचिरोली येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करणार असून, देशातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत.
या कार्यक्रमात पंतप्रधान सुमारे 3,000 कोटी रुपये खर्चाच्या 246 विकासकामांना सुरुवात करून देणार आहेत. आदिवासी भागातील शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या संधी आणि पायाभूत सुविधांचा विकास करणे हा या प्रकल्पांचा मुख्य उद्देश आहे.
https://www.prahaar.in/2026/11/13/prime-minister-modi-inaugurates-the-countrys-first-led-dome-planetarium-in-mysuru/
एकूण प्रकल्पांपैकी 173 कामांचे उद्घाटन केले जाणार आहे. यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या 38 एकलव्य मॉडेल निवासी शाळांचा आणि प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियानांतर्गत (पीएम-जनमन) सुरू करण्यात येणाऱ्या 100 बहुउद्देशीय केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांच्या माध्यमातून आदिवासी भागातील नागरिकांना आवश्यक सेवा आणि विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
याशिवाय अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे आदिवासी संशोधन संस्थेच्या इमारतीचे आणि मिझोरममधील ऐझॉल येथे रोपुइलियानी आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. या संग्रहालयातून मिझो समाजाचा इतिहास, सांस्कृतिक परंपरा आणि xब्रिटिशांविरोधात लढा देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची माहिती दिली जाणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान 19 नवीन एकलव्य मॉडेल निवासी शाळांची पायाभरणी करणार आहेत. तसेच आदिवासी उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी 12 आदिवासी बहुउद्देशीय विपणन केंद्रांचे भूमिपूजन केले जाणार आहे. पीएम-जनमन आणि धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत अन्य 42 प्रकल्पांचीही पायाभरणी होणार आहे.
1 ते 15 नोव्हेंबरदरम्यान देशभरात जनजातीय गौरव पंधरवडा साजरा करण्यात आला. या काळात आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद, साहित्य महोत्सव, आरोग्य आणि पोषण शिबिरे तसेच आदिवासी गावांमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाने या पंधरवड्याची सांगता होणार आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language