
Arbaaz Khan second wife: अभिनेता अरबाज खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. आता देखील अरबाज याचा दुसरी बायको शूरा खान हिच्यासोबत फोटो व्हायरल होत आहे. दोघांची जोडी देखील चाहत्यांना प्रचंड आवडते. शूरा कायम अरबाज याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील शूरा हिने अरबाज याच्यासोबत एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र फक्त फक्त शूरा खान हिने पोस्ट केलेल्या फोटोची चर्चा रंगली आहे. फोटोमध्ये दोघे आनंदी दिसत आहेत. शूरा हिच्या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
अरबाज-शूराचा लूक
शूराने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही अतिशय स्टायलिश आणि क्लासी डेट-नाईट लूकमध्ये दिसत आहेत. अरबाजने काळ्या रंगाचा कॅज्युअल शर्ट घातला आहे, तर शूरा फिकट निळ्या रंगाच्या स्लीव्हलेस हॉल्टर-नेक आउटफिटमध्ये दिसत आहे. तिने तिचे लांब, सरळ आणि हलके हायलाइट केलेले केस मोकळे सोडले आहेत. लाल नेल पेंट आणि हातातील अंगठी तिच्या लूकला शोभून दिसत आहे.
View this post on Instagram
शूरा खानच्या पोस्टवर अरबाजची प्रेमळ कमेंट
शूरा खानने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘पहिल्या डेटपासून ते कायमचा माझा जोडीदार होईपर्यंत. तीच जागा, जिथून सर्वकाही सुरू झालं होतं.’ तर दुसरीकडे, अरबाजनेही शूराच्या पोस्टवर कमेंट करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.
अरबाज खान याने कमेंट करत लिहिलं की, ‘कधीकधी हे सांगण्यासाठी शब्द अपुरे पडतात की माझ्या आयुष्यात तुझ्या असण्याने मी किती कृतज्ञ आहे. तुझ्या प्रेमाबद्दल, तुझ्या दयाळूपणाबद्दल आणि तू जशी आहेस, तशीच राहिल्याबद्दल तुझे आभार. तू जशी आहेस, तशीच मला खूप आवडतेस.’, सध्या शूरा हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अरबाज खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री मलायका अरोरा हिला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज याने शूरा खान हिच्यासोबत लग्न केलं. तर शूरा खान हिचं पहिलं लग्न इंटेरियर डिझायनरसोबत झालं होतं… पण काही मतभेद असल्यामुळे दोघांचे कायम वाद व्हायचे. अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला. असं देखील अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात येतं. 2023 मध्ये शूरा आणि अरबाज यांनी लग्न केलं आणि 5 ऑक्टोबर 2025 मध्ये शूरा हिने गोंडस मुलीला जन्म दिला. तिचं नाव सिपारा असं आहे.
Source: TV9 Marathi Entertainment
