Hashtagintro

Jalapeno | हॅलापिनो : मेस्किकोतून आली पिझ्झा, बर्गरमुळे जगभरात लोकप्रिय झाली!

मेक्सिकन खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली हॅलापिनो (Jalapeño) मिरची आता जगभरात लोकप्रिय झाली आहे. भारतातही पिझ्झा, बर्गर, सँडविच आणि सॅलडमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.

तिखट आणि किंचित आंबट-गोड चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या या हिरव्या मिरचीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.

या मिरचीचा उगम मेक्सिकोमधील ‘हॅलापा’ (Xalapa) या शहरात झाला, त्यावरूनच तिला ‘हॅलापिनो’ हे नाव मिळाले आहे. (स्पॅनिश उच्चारानुसार ‘J’ चा उच्चार ‘ह’ असा केला जातो)

मिरचीचा तिखटपणा मोजण्याच्या ‘स्कोव्हिल स्केल’वर (SHU) हॅलापिनो मिरचीचा स्तर २,५०० ते ८,००० SHU इतका असतो. ती भारतीय हिरव्या मिरचीपेक्षा तुलनेने कमी तिखट आणि खाण्यास सुसह्य असते.

ताज्या मिरचीपेक्षा व्हिनेगर आणि मिठाच्या पाण्यात मुरवलेली हॅलापिनो मिरची जगभरात सर्वाधिक लोकप्रिय आहे, कारण त्यामुळे तिला एक खास आंबट-तिखट चव येते आणि ती जास्त काळ टिकते.

या मिरचीमध्ये ‘कॅप्सेसिन’ नावाचा सक्रिय घटक असतो, जो शरीराची चयापचय क्रिया वेगवान करतो. यामुळे कॅलरीज वेगाने बर्न होतात आणि भूक नियंत्रित राहण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते: हॅलापिनोमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ आणि ‘व्हिटॅमिन ए’ भरपूर प्रमाणात असते. हे अँटिऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि संसर्गापासून बचाव करतात.

यातील कॅप्सेसिन आणि फ्लेव्होनॉइड्स रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.

मर्यादित प्रमाणात या मिरचीचे सेवन केल्यास पोटातील पाचक रसांची निर्मिती सुधारते आणि पोटाच्या आतील अस्तराचे हानिकारक बॅक्टेरियापासून संरक्षण होते.

संशोधनानुसार, कॅप्सेसिन घटक शरीरातील कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी आणि निरोगी पेशींचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language