Hashtagintro

केतू बदलणार चाल; मेष, वृषभसह 6 राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या कोणत्या राशींना मिळेल फायदा

केतू बदलणार चाल; मेष, वृषभसह 6 राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या कोणत्या राशींना मिळेल फायदा

ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि केतू या छाया ग्रहांच्या राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. ५ डिसेंबर २०२६ रोजी केतू कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क ही चंद्राची रास असल्याने या गोचराचा काही राशींवर विशेष प्रभाव पडू शकतो. केतूचा संबंध ज्ञान, वैराग्य आणि आध्यात्मिकतेशी जोडला जातो. केतूची स्थिती अनुकूल असल्यास व्यक्तीला ज्ञान आणि समज वाढवण्यास मदत होते, असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते. या काळात कोणताही निर्णय घाईघाईने न घेता विचारपूर्वक घेणे महत्त्वाचे ठरेल. तसेच ध्यानधारणा करणे आणि गणपतीची पूजा करणे शुभ मानले जाते. जाणून घेऊया, या गोचराचा मेष ते कन्या या सहा राशींवर काय परिणाम होऊ शकतो.

मेष

निर्णय घेताना अधिक सावध राहा. कोणताही महत्त्वाचा निर्णय घाईत घेऊ नका. एखाद्या विषयावर मतभेद किंवा वाद झाल्यास त्याचा मनावर जास्त परिणाम करून घेऊ नका. प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करण्याऐवजी शांतपणे परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा.

वृषभ

आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडू शकतात. आतापर्यंत सुरू असलेली एखादी गोष्ट थांबवून नवीन कामाची सुरुवात करण्याचा विचार करू शकता. या काळात प्रगतीच्या काही संधी मिळू शकतात. कौटुंबिक बाबतीतही तुमचे विचार आणि कुटुंबातील सदस्यांचे विचार जुळण्याची शक्यता आहे.

मिथुन

केतूचे गोचर तुमच्यासाठी काही आव्हाने घेऊन येऊ शकते. विशेषतः नात्यांमध्ये मतभेद किंवा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीतही काही बदल घडू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची संधी मिळू शकते. मात्र, पैशांशी संबंधित कोणताही निर्णय घेताना योग्य विचार करणे आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

कर्क

केतूचा प्रवेश तुमच्या राशीच्या लग्न भावात होणार आहे. त्यामुळे मन विचलित होऊ शकते. नेमके काय सुरू आहे किंवा कोणत्या दिशेने पुढे जायचे आहे, याबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही बोलण्यात अधिक सक्रिय असाल; मात्र इतरांचे म्हणणे ऐकण्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे संवाद साधताना समोरच्या व्यक्तीचे म्हणणेही समजून घेण्याचा प्रयत्न करा.

सिंह

परदेश प्रवासाचे योग निर्माण होऊ शकतात. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते; मात्र तिथे कायमस्वरूपी स्थायिक होण्याबाबत स्पष्टता मिळेलच असे नाही. आर्थिक बाबतीत काही सकारात्मक घडामोडी होऊ शकतात आणि आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्न करता येतील. मात्र, शनीच्या प्रभावामुळे काही अडचणी येण्याची शक्यता आहे. खर्च वाढू शकतात, त्यामुळे आर्थिक नियोजन करून अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

कन्या

या काळात तुम्ही स्वतःच्या मेहनतीवर आणि क्षमतेवर अधिक अवलंबून राहाल. मात्र, प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहण्याच्या स्वभावामुळे मित्र किंवा जवळच्या व्यक्तींसोबत मतभेद होऊ शकतात. तुमच्या आयुष्यातील एखादे मोठे ध्येय किंवा प्राधान्य बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक पावले उचला. तसेच आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language